Thursday, January 13, 2011

पुरुषोत्तम जनरल स्टोर्स

सहज पणे कुणाशी बोलायला लागलो की विषयांची कमतरता भासत नाही. समोरची व्यक्ती
वैचारिक बैठकितली असेल तर मुद्दाम असे विषय काढले जातात. असाच एक विषय निघाला.
रस्त्यावरच्या भिकाऱ्याला RS १०० दिले तर तो काय करेल.उत्स्फूर्त कल्पनाशक्ती
वापरून मी वेळ मारून नेली, पण मनाच्या कोपर्यात विषय चालूच होता.शब्दांचे खेळ
करून स्वतच्या भावना पोचवायचे  सामर्थ्य माझ्यात नाही.

सिग्नलला उभा राहिलेलो मी. दुचाकी वर. हेल्मेट घालून. कानात i -pod वरची गाणी
चालू. माझ्या आठवणीतला सगळ्यात जख्खड म्हातारा. काठी टेकत टेकत, डोक्याला
मळलेला फडके गुंडाळलेला. माझ्या पर्यंत पोचतो. चेहरा अजून मला डोळ्यासमोर
दिसतोय. डाव्या डोळ्यात बहुदा मोतीबिंदू झालेला. का? अजूनही कळत नाही पण मी
त्याला १०० ची नोट दिली. त्याचा चेहरा. मी नाही शब्दात सांगू शकत. सोपा उपाय,
फोटो काढून ठेवला.तरीपण आनंद आश्चर्य ह्याच काहीतरी विचित्र combination.  चक
दे च्या एंड ला शाहरुखचा होतो तसा काहीतरी चेहरा. शेजारचे hang. एक भुवई वर करून
छोटास  smile देऊन मी गेलो. 


गाडी u turn मारून मी समोरच्या टपरीवर जाऊन बसलो. मुद्दाम. त्या बाबांना दिसणार
नाही असं. एक cutting घेऊन बसलो. बाबा complete आश्चर्य चकित होऊन इकडे तिकडे
बघत उभे राहिले. उन्हाची एक तिरीप मळलेल्या कापडावर पडून चेहरा उजळावत होता.
उजव्या बाहीने घाम पुसून उलटे वळले आणि नेहमीच्या जागी येऊन बसले. इतका वेळ
एकेरीत असलेला भिकारी एकदम आदरार्थी बाबांवर आले. अजूनहि चेहर्या वर हसू आले
नव्हते. नेहमीच्याच जागी बाबा अस्वस्थ होऊन चक्क मांडी घालून बसले. 
.
शांतपणे observe करत बसायचे असे ठरवले अजून एक cutting घेतला . २ phone पण आले
पण ते cut केले. बाबांनी पारावरल्या बाचक्यातून मळकट बाटली काढली आणि पाणी प्यायले.
नंतर ४ सिग्नल सुटले असतील, पिवळ्या दिव्याला बाटली उघडणार आणि लाल दिव्याला
परत ठेवणार. शंभराची नोट अजून तशीच हातात होती.थोडीशी ओली झालेली.  १५ एक मिनिटे अशीच गेली असतील.
पारावर छोटेसे देऊळ होते. just दगडाला शेंदूर  फासलेले. आणि त्यावर कमान.
बाबांनी ती नोटे केशरी दगडाखाली ठेवली आणि उठले. 

शंभराची नोट कधी पाहिली नसेल असं वाटत नाही. शंभर रुपयेच नसतील असही होणार
नाही. सगळे सुटते जमवले तर नक्की जास्त भरतील. मग बाबा hang का झाले? का मी
hang झालो होतो?

तिथून उठल्यावर बाबा सरळ माझ्या दिशेनी यायला लागले. हे जाणवल्यावर मी लगेच आडोश्याला जाऊन बसलो. बाबा चहावाल्या पोर्यापाशी आले .
"क्योन चाचा ? आज तो ऐश हैं ! सौ रपये मिल गये ."
"अरेय हां हान. तुमने भी देखा क्या ?"
"लेकीन येह नाही समझा वो भगवान के नीचे क्योन रख  दिये ?"
"तू नही समझेगा ...छोड  दे ."
"नही! बताव तो सही ...कुच तो matter रहेगा ."
"ठीक हैं ..लेकीन मै मराठी मैन बोलेगा ..हा सिग्नल ह्वायाच्या आधी माझे हिथे एक बारीकसे दुकान होते, गोळ्या बिस्कुताचे  . जशी  उमर वाढत गेली, दिसायला कमी झाले. मग दुकान बंद केलं आणि मुलाकडे राहायला गेलो. पण मन रमेना. रोजची नवरा बायकोची भांडणे, नको झाली होती. गाठीशी थोडा पैका होता, भाहीर पडलो. खुटे  जायचे नक्की नव्हता. शेवटाला हितेच आलो. आता सिग्नलला जुने चेहरे दिसतात का ते बघतो. लोकांसि काय वाटत, ते थोडे पैसे द्येतात. पण छोटी पोरे आता बडी झाली..आता ओळखायला येत न्हाईत...."
"...पण हा बेटा याद हाय मला. हाफ प्यांटीत यायचा आई बरुबर. आई देवळात जायची  तर हा भाहीरच उभा. गोळ्या बगत. म्या रोज पाहायचो. परत जाताना गोळ्या घ्यायचा.तेचा बारीकसा हात अजून आठीवतो हाय.गोळ्यांच्या नादात  हा बेटा कधीच आत न्हाई गेला. आज म्या ह्याला पक्का ओळखला. त्योच हाय. त्याचे हे पैसे न्हाहित, देवास्नी दिलेला दान हाय. त्ये देवाला पोचीवला. त्याला देवाचा हात मिळेल." 

------

'पुरुषोत्तम जनरल स्टोर्स' चे   आजोबा असे भेटतील असे कधीच वाटले नव्हते,
उभ्या उभ्या..चार चौघात डोळ्यात कधी पाणी दाटले नव्हते.

आठवणींच्या मागे मी वेड्यासारखा पळायचो,
आठवणी सावली सारख्या मागेच  असतील  असे वाटले नव्हते..
उभ्या उभ्या..चार चौघात डोळ्यात कधी पाणी दाटले नव्हते....

3 comments:

  1. केवळ अप्रतिम !

    ReplyDelete
  2. Amezing ahe ...ani photo pan lai bharii alai ... akdam bolka.. Keep the the work going...

    ReplyDelete