मला चंद्र आवडतो.
स्वयंप्रकाशित नसला,
तरीही प्रकाशमान .
असं वाटत कि माझे सगळं म्हणण
तोच ऐकून घेतो.
एकही शब्द उलटा reflect न करता
सच्च्या दिलानं.
मला अमावस्येचा चंद्र आवडतो
स्वतःचं अस्तित्व न दाखवणारा
ध्रुवा पेक्षाही अढळ.
अमावास्येच्या रात्री मी मुद्दामहून गच्चीवर जातो
त्याला शोधायचा खूप प्रयत्न करतो
त्याला खूप काही सांगायच असतं
मी सांगून मोकळा होतो
तो मात्र दिसतच नाही
मग मला प्रतिपदेची कोर आवडली ..
“मी आहे ”.असं सांगणारी
पण छोटासी ती ..माझं सगळ ऐकून घेईल का?
मग द्वितीया…तृतिया ..
अष्टमी ..perfect half
पण मन भरत नाही.
मग वाटलं पौर्णिमेचा चंद्र खरा .
कसा एकदम प्रकाशमान
पण एव्हढ्या प्रकाशाचा त्रास होतो
मी सच्च्या दिलानं त्याला सांगू शकत नाही.
मला अमावास्येचाच चंद्र आठवतो
स्वतःचं अस्तित्व न दाखवणारा
तरीही तिथेच असणारा
माझं सगळं ऐकून घेणारा….
सच्च्या दिलान …