फ्फुफुफुऊमेणबत्ती विझवली,२ पेग भरले,आणि कोपर्यात एकट्या बसलेल्या
'अंधारा'ला मैफिलीला बोलावले.
शेवटी मीच सुरुवात केली.
"लहानपणी मी तुला घाबरायचो,मग तू हवाहवासा वाटू लागलास,तुझ्या शोधार्थ रात्री जगू लागल्या,आणि तू दोस्त कधी झालास कळलंच नाही..काय बोलतो?"
"repeat "
"मी तुला खूप भ्यायलो,तुझ्याशी खूप भांडलो,तुझ्याबरोबर फिरलो..तुला काहीच बोलायचे नाही?"
ह्या वेळेस काहीच उत्तर आले नाही..
मेणबत्ती लावली,तर हा पुन्हा त्याच कोपर्यात.एकटा.
मेणबत्ती विझवली,
परत कोपर्यात,स्पष्ट काळोखात,'अंधारा'चा एक एक रंग,लख्ख उजळत होता.