Sunday, January 16, 2011

छत्री

संध्याकाळी चार पाचचा सुमार असेल. कंपनीतून लवकर निघालो होतो. spicer college  रोडवर एक bus stop आहे. bus stop च्या पुढे साधारण शे पाऊणशे फुटांवर गाडी लावली. जीवनावश्यक वस्तू (पाणी आणि camera ) घेतल्या, एक छत्रीपण घेतली आणि stop वर येऊन बसलो.  नक्की सांगता  नाही angle काय होता, पण मी busstop वर बसलो. बर्यापैके शेड होती. बाकडी पण होती. मागच्या बाजूला डेरेदार वृक्ष होता. त्यामुळे एकंदरीत long shot छान आला असता ..

रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती, तसाच bus stop पण शांत होता. उजव्या बाजूनी एक आजोबा काठी टेकतात तशी छत्री टेकत टेकत येत होते. stop पाशी आल्यावर छत्री शेजारी ठेवली, माझ्या कडे बघून हसले  आणि बसले. माझा पूर्ण लक्ष त्यांच्या छत्री कडे होते. लांब सडक छत्री, वळणदार मूठ, पुढे एक टोक, एकाच घडीची, बहुतेक 'हिरण' ब्रांड असेल. पण काही बारीक भोकं पडली होती. as against  माझी छत्री छोटीशी होती, सरळ पकड, दोन तीन फोल्ड वाली असेल, पण भोकं पडली आहेत का हे माहित व्हायला अजून उदघाटन केलं नव्हत.

 generation चा फरक न्याहाळत असतना हलकेच हसू आले आणि मला लहानपण आठवले.  अगदी लहान असताना "अरेय चिकू च्या डोळ्यात जाईल, छत्री लांब ठेवा" हे शब्द. ऐकल्याचा आठवत नाही पण असेच काहीसे असणार. आठवण तळघरात पोचते ते दुसरी तिसरी पर्यंत. तेंव्हा मी आणि सुन्या छत्री  छत्री खेळायचो. काय नाव आहे ना? छत्री छत्री. (असल्या खेळांची नाव दोनदा का घेतात ते माहित नाही, like घर घर, शाळा शाळा असले खेळ असायचे).  नंतर शाळेत जाताना छत्रीचा खरा वापर सुरु झाला. तेंव्हा शाळेत बस नि जायचो. ते अगदी college मध्ये असताना ' प्यार हुआ  इकरार हुआ ' style पर्यंत.

मीच आश्चर्यचकित होऊन स्वताशीच हसायला लागलो. हलकेच smile आले. तेव्हढ्यात एक छोट्या, bugs bunny ची छत्री घेऊन त्याच्या आईबरोबर बस stop वर आला आणि मला आठवणींच्या राज्यात परत घेऊन गेला. आम्ही तर फक्त काळ्याच छत्र्या वापरल्या. पावसाळ्यात उगवणाऱ्या कुत्र्यांच्या छत्र्या ह्या पांढर्या. काय ना? कुत्र्याची छत्री. तेंव्हा भिजत भिजत ह्या गमती पाहायला बाहेर पडायचो. आणि नंतर college च्या काळात छत्री घेऊन बाहेर पडायचो आणि गमती करायचो. माझ्या कडे उलट्या छत्रीचा पण एक फोटो आहे. खरच भारी.

'ठौंयिक छिक' अप्पा भिंगार्देन्च्या style मध्ये कोणीतरी शिंकला. ओह्ह. पाऊस सुरु झाला होता आणि झाडाच्या आडोश्याला दुचाकी वाले येऊन थांबत होते. Dio वर दोन मुलीपण येऊन थांबल्या आणि माझी डावी भुवई कधी वर गेली मलाच कळलं नाही. आता लोकांची गर्दी होणार. मनात म्हटलं आता निघावे. छतावरून टपकणारे थेंब, बनीची छत्री, dio वरच्या मुली..असे मोहक क्षण सोडून मी फक्त आजोबांच्या छत्रीचा फोटो काढला. bunty bubbli style मान मोडत उठलो. कसं काय माहित नाही पण चुकून आजोबांना म्हणून गेलो " चला आजोबा आपण निघूया"   ****! बाप रे!  मला जाम विचित्र वाटलं.

आजोबा मात्र बिनधास्त बोलून गेले "छत्री चा वापर आता फक्त काठी सारखाच  होतो. मी पाऊस थांबल्यावरच  निघेन."

No comments:

Post a Comment