Tuesday, August 10, 2021

अंधार


फ्फुफुफुऊ
मेणबत्ती विझवली,
२ पेग भरले,
आणि कोपर्यात एकट्या बसलेल्या 
'अंधारा'ला मैफिलीला बोलावले.

शेवटी मीच सुरुवात केली.

"लहानपणी मी तुला घाबरायचो,
मग तू हवाहवासा वाटू लागलास,
 तुझ्या शोधार्थ  रात्री जगू लागल्या,
आणि तू दोस्त कधी झालास कळलंच नाही..
काय बोलतो?"

"repeat "  

"मी तुला खूप भ्यायलो,
तुझ्याशी खूप  भांडलो,
तुझ्याबरोबर फिरलो..
तुला काहीच बोलायचे नाही?"

ह्या वेळेस काहीच उत्तर आले नाही..

 मेणबत्ती लावली,
तर हा पुन्हा त्याच कोपर्यात.
एकटा.

मेणबत्ती विझवली,

परत कोपर्यात,
स्पष्ट काळोखात,
'अंधारा'चा एक एक रंग,
लख्ख उजळत होता.


Saturday, January 9, 2021

ध्रुव

आज मला खुणावतोय तो ध्रुव,
खरंतर त्याचं ते अढळपद.

त्यालाही इतका त्रास झाला असेल?
त्याची तपश्चर्या किती मोठी असेल?

कसं वाटत असेल त्याला?
दूर, तिथे...

एकांताच वरदान मिळाले असेल,
का
एकटेपणाचा शाप?

काय रे ध्रुवा?
तेंव्हा किती त्रास झालेला?
आणि आत्ता कसं वाटतंय?

आला असेल कंटाळा
किंवा 
जाणीव करून द्यायची असेल,
ह्या ओझ्याची..

तर

निमिषार्धासाठी देशील का,
तुझं अढळपद.
जिथून कोणी हलवू शकणार नाही मला.