रात्री 2 वाजताचा पाऊस.
ना चमचमत्या विजांचा
ना गडगडत्या ढगांचा ..
पाउसाचा पाऊस.
शांत पाऊस
अविश्रांत पाऊस.
खिडकी उघडून कट्ट्यावर दोन्ही हातांची घडी घालून बसलो.
मान हातांवर ठेवली आणि पाऊस बघत बसलो.
रात्री 2.15 चा पाऊस.
संथ वारा वाहतो.
झाडांचा hissing sound
कानामागे तिचे भास
अंगणातल्या तळ्यात आणि street light च्या उजेडात
दिसणारं तिचं प्रतिबिंब.
प्रत्येक थेंबापरी तिची वेगळी आठवण.
ह्या आठवणी जागवणारा
मला वेगळ्या जगात नेणारा
मनातला पाऊस.
सरसकट पाऊस .
पण पाउसाच्या मनात काहीतरी वेगळं होतं. रोमांचित विचारात अडकलेल्या माझ्या चेहऱ्या वर पाणी मारलं. आणि मला जाग केलं.
रात्री 2.30 चा पाऊस.
हळुवार पाऊस
काहीतरी सांगणारा पाऊस.
एक एक शब्द
तोलून मापून .
प्रगल्भ पाऊस.(matured paus)
तरीपण माझ्यातालाच एक वाटणारा.
मित्र पाऊस.
टिपिक टिपिक थेम्बातून
जाणीवपूर्वक
अर्थ लावत होतो मी
प्रत्येक थेंबाचा ..
शांत पाऊस .
मनातला पाऊस .
रात्रीचा पाऊस .
shanta an sundar tone ahe ekandar. artha lavat an links jodat maan ekdam bhalatikade jatach ;)
ReplyDelete