Tuesday, November 15, 2011

सदाफुली


तिच्या खोलीतली 
सदाफुली कोमेजली आहे .
छान हवा सुटलीये ..
संध्याकाळची …
सकाळ संध्याकाळ पाणी घातलंय .
छान सूर्यप्रकाशात ठेवलंय ..
तरी पण 
सदाफुली कोमेजली आहे …

तिच्या खोलीतली सदाफुली 
आज हि तिथेच आहे ..
रोज 3-4 फुले तरी असतातच 
पण कोमेजलेली ..

ती गेल्या वर .
खरंतर 
घरातले सगळेच उदास होते ..
अजूनही तिची खोली तिचीच म्हणून आहे ..

पण सवय झालीये सगळ्यांना आता 
तिचं सुती पातळ घेऊनच नात झोपी जाते ..
मोठा मुलगा सुद्धा अजून तिचाच अडकित्ता वापरतो 
सुनबाई, सासूबाईनचेच मसाले वापरतात .
तरीपण 
सदाफुली  ..

ती नसण्याची सवय झाली असेल सगळ्यांना 

सदाफुली मात्र अजून ,
तिचा स्पर्श तर नसेल शोधत ..
सुरकुतलेल्या हातांचा का होईना 
पण मायेचा ?
दिवसातून एकदाच मिळणारे पण 
देवाचे  निर्माल्यासह पाणी ?
इतरांना ठसका लावणारा खरा 
पण तो तिच्या मशेरीचा वास ?

आजीच्या खणात आता नातीचे bracelet असते ,
आजीच्या कोपर्यात आता मुलाचा laptop असतो ,
आजीची मोहनमाळ आता सूनबाईच्या गळ्यात असते ,
आजीची सदाफुली मात्र 
आज पण कोमेजली आहे ,
आज पण उदास आहे ..

आजीसाठी .