Friday, January 21, 2011

Sorry!



परवा पु.ल.देशपांडे उद्यानात गेलो होतो. दादोजींचा पुतळा तिथे ठेवलाय हे माहित होते. actually तो पुतळा बघायला गेलो नव्हतो. मी as a routine गेलो होतो. डाव्या हाताला दादोजींचा पुतळा दिसला, आणि पुतळ्याच्या डाव्या हाताला एक रक्षक. (काय  sarcasm आहे नं? दादोजींच्या पुतळयाला रक्षक.) काय विचार आले मनात?, पण त्या पुतळ्याकडे बघत थोडसं अलीकडे कठड्यावर बसलो. मी त्या पुतळ्याकडे बघत होतो आणि तो रक्षक माझ्याकडे.
exactly कसला विचार करत होतो ते सांगता येणार नाही, पण एकंदरीत पुतळ्याचे रूप न्याहाळत होतो. छानच आहे पुतळा. हे पुतळे एकाच रंगात का करतात माहित नाही. तरीसुद्धा भारदस्त होता. खरे खुरे दादोजी समोर उभे राहिले असते तर तो पुतळा हलवायची कोणाची हिम्मत झाली नसती आणि मग त्यावरून दंगा पण झाला नसता.  
मग आता पुढे काय? साहजिकच दादोजिंबाबत विचार करायला लागलो, त्यांच्या विषयीच्या सर्व चर्चा, सर्व लेख आठवले ...पण दादोजींनी शिवाजीराजांना शिकवले ह्या पलीकडे मला काहीच माहित नाही. माझे इतिहासाचे ज्ञान तोकडे आहे, का आम्हाला एव्हढेच शिकवले? पण खरंच ह्या पेक्षा जास्त माहीत असण्याची गरज होती का? मला तर खरंच वाटत नाही. त्यातून वाद काय आहे हे तर जाणून घ्यायची  अजिबात नाही. basically matter काय आहे इथपर्यंत, ठीक आहे पण त्यावर काहीच बोलायचं नाहीये .. काय वाटत असेल दादोजींना? शंभर टक्के हाणला असता सगळ्यांना ..
how  must he be feeling? bull shit.
"खरंय यार ! जाम फालतू आहेत हे लोक." मी मान वळवली तर दादोजी माझ्याशी बोलत होते.
दादोजी म्हणल्यावर " मुघल सत्तेने चालवलेले कारस्थान थांबवलेच पाहिजे. मायबापाची काळजी घेतलीच पाहिजे .." असले  काहीतरी  तडफदार  वाक्य पाहिजे  होते, पण  हे  काहीतरी  वेगळेच  होते .
"काय ?" मी .
हलकीशी स्मितरेषा चेहऱ्यावर पाहून मी तर hang च झालो.
"तुम्ही हसताय ?"
"अरेय पु लंच्या राज्यात येऊन न हसायला मला काय वेड लागले आहे?"
"काय?"
"तू पुणेकर, नागपूरकर कि मुंबईकर? पु  लंच्या joke  वर हसत नाही का तुम्ही?" दादोजी  काय बोलत होते, मी साफ हरलो होतो.
"दादोजी तुम्हाला नेहमीच गुरुस्थानी पहिले होते. पण तुमचे हे रूप नवीन आहे. आणि तुम्हाला पु ल काय माहित?"
"खरे सांगू का? इथे मोकळ्या हवेत खरच बरं वाटते. लाल महालात अख्खे आयुष्य काढले. नजीकच्या काळात तर जीव गुदमरायचा. नको व्हायचं अगदी, काही बाही ऐकून. इतिहास हा शिकण्यासाठी असतो रे. चांगल्या गोष्टीतून बोध घ्यायचा, चुका सुधारायच्या. त्यातून अन्वयार्थ काढून, जुन्या गोष्टी उकरून त्यावरून आज भांडण्यात काय अर्थ आहे. अजून तुम्हाला कळत कसे नाही, हे फिरंगी आग लावतात तुमच्यात आणि तुम्ही आपापसात भांडत बसता. आणि पु लं विषयी इथे येऊनच कळले. एकदा आले होते लाल महालात, पण उडती भेट होती अगदीच."
"ठीक आहे, पण हा शॉक आहे माझ्यासाठी. मी लोकांना सांगितले की दादोजी माझ्याशी असे बोलत होते तर वेड्यात काढतील मला."  
"लोकांचा काय घेऊन बसलास? शहाण्या माणसाला वेडा ठरवण्यात हातखंडा आहे त्यांचा."
मला काय बोलावे काहीच सुचत नव्हते. थोडी हिम्मत करून म्हणालो " तुम्हाला फारच विचित्र वाटत असेल हे सगळे ऐकून, rather भोगून. खरच i am sorry for that ."
"sorry कसले अरेय! खरं सांगू का? जे काही चालू आहे ते खरंच कळण्याच्या पलीकडे आहे. आम्ही त्या काळी काय परीस्थितीत जगलो?, हे मराठी राज्य केलं? ह्यांना काय माहित? जे केलं त्यातून प्रेरणा घ्यायचं सोडून वेगळंच काहीतरी. ह्या फिरंग्यांना जो काही अन्वयार्थ काढायचा आहे तो काढू देत, पण आपण मराठी लोकांना एव्हढं कळायला पाहिजे न काय काय घ्यायचं आणि कशाला विरोध करायचा? त्या फिरंग्यांनी केले संशोधन , ठीक आहे. तू तुझ्या घरी चांगला. हे लोक आमचे आदर्श आहेत आणि आम्ही तुमच्या विचारला थारा देत नाही, हे एव्हढा सांगायची हिम्मत नसेल तर कसले सरकार तुमचे?  सद्सद्विवेक बुद्धी कुठे गेली? आणि मग सत्तेच्या विरोधात गेले तर काय चूक आहे दंगा करणाऱ्यांची? त्यांनी विरोध दर्शवण्याचा मार्ग बदलावा, पण शाळेच्या पुस्तकातून आम्हाला काढून इतिहास पुसण्याचा विचार असेल सरकारचा तर हा आमचा अपमान आहे. हा शिवाजी राजांचा अपमान आहे. हा आई भवानी चा अपमान आहे. "  
i  swear जाम frustrating वाटत असेल.
"काय बोलणार मी ह्यावर. सगळं कळतंय मला पण माझ्या हातात काहीच नाहीये. शरमेनी मान खाली घालण्या शिवाय मी काहीच करू शकत नाही. तुमच्या आणि शिवबाच्या गोष्टी आम्ही मुलांना सांगतो, आणि ह्याच मुलांनी तुम्हाला बागेत असे उघड्यावर पहिले काय विचारतील आम्हाला ? विचारच करवत नाही. damn sorry sir .."
"अरेय! sorry परत? पुढची मजा मी सांगतो. २ वर्षांनी परत निवडणुका आहेत. त्या वेळी सत्ता बदलली की  आमची परत रवानगी होणार कुठेतरी.मग परत दंगा. काही सांगता येत नाही. येरवड्याच्या जेल मध्ये पण ठेवायला कमी करणार नाही हे लोक. मग आपली भेट होणे अवघड आहे. तुला जर काही करणे शक्य असेल तर एक कर, इथून मला परत लाल महालात नको, सिंहगडावर न्या. त्या मर्द मावळ्या तानाजी बरोबर बसेन. जुन्या आठवणीत मन रमेल. तुमच्या पासून दूर. नकोच इथे. आणि हो, तिथे आपली भेट होईल नक्कीच." 
मला खरच वेड लागले होते. मोठ्या आवाजात बोलून गेलो. sorry सर.
खरंच sorry .

No comments:

Post a Comment