शनिवारी संध्याकाळी साधारण ७.३० ची वेळ असेल, काही काम नव्हतं.एकटाच होतो. सुन्या मुंबईला गेला होता. "मैत्रीण" ला भेटायला. आणि पिल्लू आणि माझं भांडण झालं होतं. Gmail वर sign in केलं. inbox मधल्या unread mail check करेस्तोवर. 'ती' online आली. मी invisible होतो. काय करावे? अश्या स्थितीत सुन्याचा mail न वाचताच परत inbox ला गेलो. सगळ्या आठवणी आणि विसरणी डोळ्या समोरून झर्रकन सरल्या.
सरळ visible व्हावं, तर ती hi तरी करेल का? समजा तिनी नाही केलं, आणि मी केलं तर reply तरी देईल का? मी का ping करायचं? असे काहीसे egoistic प्रश्न जमून आले आणि जोराचा पाऊस सुरु झाला. आतल्या आत. ओह्ह. त्या पेक्षा सरळ sign out होऊयात. कटकट नको डोक्याला. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी.
काम तर काहीच नव्हत. उगाच कुठले तरी फोटो काढले आणि बघत बसलो. कुठले ते आठवत नाही. मधूनच ALT +TAB नि gmail वर जात होतो. अजूनही 'ती' होती. बास. go to hell. visible झालो.
no hi no hello. फुल जळजळ.
"च्यायला. उगाच झालो visible. स्वत स्वताची मारून घेतली. "
"तरी सांगत होतो sign out हो. त्यातच भलाई आहे. पण नाही. "
हिरवा light orange झाला.
"हाहा ती जागेवरच नाहीये. असती तर केलं असतं पिंग"
"ठीके पण तू आता का त्याच्या पिंग ची वाट बघतोय?"
"का म्हणजे काय? we know each other "
" we are frnds म्हणायला आज जीभ धजावत नाहीये"
"आम्ही आहोतच, सध्या जरा थोडीशी game झालीये इतकाच. she might be busy somewhere else "
"काय किस्सा काय झालाय?"
"जसा काही तुला माहीतच नाहीये."
" हाहा. झगडे तो पहले भी होते थे, पर एक missed call पे सरी कडवाहट मुस्कुराहट में बदल जाती थी.ह्या type दिसतंय काहीतरी. बोल बोल "
"हो पण परवाच भांडण जरा लागलं.मी लई विचार करत होतो, पण आता झालय अस कि मी काय बोललो तेच आठवत नाहीये आणि नुसतीच तिची आठवण येत आहे. "
"मग आता विचार काय आहे? काय करायचं ठरवल आहेस?"
"तेच करून करून वेडा झालोय. पण काहीच ठरत नाहीये. बघ ना आता, आम्ही दोघे एकमेकांना ४ वर्ष तरी ओळखत आहोत. you know all stuff, how we met n all that. Then we started feeling something for each other. you said मी प्रेमात पडलोय. मग पुढे काही करायची गरजच नाही पडली. तशी ती समजूतदार आहे पण परवा काय झाला होते काय माहीत ?"
"हम्म"
" हम्म काय साल्या सांग ना काहीतरी."
" नाही नाही तू मोकळा हो आधी, मग मी आहेच."
'साला. i was thinking like, हि आत्ताच एव्हढी का मनाला लावून घेतीये? मी काहीतरी major काशी घातलीये आणि मला त्याचा पत्ताच नाहीये. Then i started feeling like, she might be feeling something unsecured. means she knows i care for her, am always there to help her.शेवटी नात्यातली security पण महत्वाची असेल. आम्ही बराच वेळ एकत्र घालवतो. we share lots of things. But there is a thin line of threshold. I feel i need to be more responsible relationship wise. सर्व चांगल्या गोष्टी जरी असल्या तरी जबाबदारीची जाणीव झाली कि एक विश्वास निर्माण होतो. long term relations."
"Sounds good. hmm.actually pretty responsible"
"खेच तू साल्या"
"k , मग आता plan काय आहे?"
"तेच तर कळत नाहीये. "
"i feel सरळ propose का नाही करत तिला?"
"आत्ता?परत? काय angle काय आहे?"
"हे बघ तुला जबादारीची जाणीव झालीये, is a good thing . But she must know that this change has taken a place ."
"म्हणजे तुला वाटत m thinking on a right track ?"
"certainly dude ."
"बाप. इतका सरळ तू कधीच बोलला नव्हतास. मग काय करू? i mean कसं करू? direct लग्नाची मागणी घालू का?"
"अजून काही उरलाय का?"
"best way चहा पोहे बनव आणि invite her . proper arrange marriage चा दाखवण्याचा कार्यक्रम होऊन जावू दे"
"काहीही."
"बर आतासाठी तर चहा बनव. काळजी नको करू. मी नाही तुला होकार देणार."
"shhhhhheeee max disgusting . बाजार उठलाय तुझा. बस मी चहा टाकतो."
"hi.... kasa ahes?"
" हाहाहा . तिनी केलं पिंग. हो बाजू."
"man this is my turn right now . तू चहा टाक मी करतो chat तिच्याशी. तुला नाही जमत ते."
and they live ....ever-after
..