अश्या संथ पण सुरेख जिंदगीत एक दिवस एक मुलगी आली आणि सगळे आयुष्य बदललं. हे सगळे खोटे आहे. असं काही होत नसतं. हम आम आदमी हैं. Mango people. असं काहीच झालं नाही. पण काहीतरी वेगळं झालं नाही तर पुढे कोणी वाचणार नाही.
तारीख कितीही लक्षात ठेवायची नाही म्हणले तरी, तो दिवस माझ्या अजून लक्षात आहे . 19 Feb 2009. गुरुवार होता. कुठून तरी भटकून घरी आलो. सवयीप्रमाणे घरी आल्यावर कपडे बदलले, वेळ नेहमीपेक्षा थोडी लवकरची होती पण अंधार नक्की पडला होता. देवघरासमोर दिवा लावायला गेलो, लावला पण ... नेहमीप्रमाणे single colour tone च्या photo चा विचार करत समोर पहिले तर मूर्ती गायब होत्या.
का कोण जाणे पण छदमी हसू आले. जसे काही हे मला अपेक्षित होते, किंवा मला तसेच हवे होते. पण आश्चर्य पण वाटले. घरात बाकी सगळे (?) असताना हेच सगळे लोक कुठे गेले? काहीतरी वेगळ्या विचारात उठलो. बहुतेक विठोबाच्या आधी पोटोबाचा विचार करायची जुनी सवय सावलीसारखी न बोलावता पाठी फिरत होती .
का कोण जाणे पण छदमी हसू
जेवणाची सोय केली. पोटोबा शांत झाला आणि विठोबांनी परत हात कटेवरी घेऊन मान वर काढली. कुठे गेले असतील पेक्षा 'मी मगाशी असं का हसलो?' हा प्रश्न त्रास देत होता. कितीही photo काढायचा नाही असं ठरवलं तरी त्या imagined photo मधला मोकळ ताम्हण त्रास देत होता. Imagined photo मधली छोटीशीसुद्धा चुकलेली जागा जीवाला घोर लावून जाते ..ह्याच्या उलट imagine केलेला photo अगदी तसाच्या तसा दिसला तर मात्र मी photo न काढता तसंच बघत उभा राहतो. असं का होतं हे नाही कळलं अजून.
सवयीप्रमाणे माझ्या हसण्याचे प्रयोजन मी मलाच समजावू पाहत होतो. अंथरुण पाहून पाय पसरले आणि छताकडे पाहत उजळणी सुरु झाली. जगाची देव ह्या संकल्पनेची व्याख्या .. माझ्यासाठी मी तयार केलेली व्याख्या ..जगासाठीचे आस्तिक नास्तीकात्वाचे मापदंड आणि माझी त्याच्याशी मीच घालू पाहत असलेली सांगड .मनातल्या मनात द्वंद्व सुरु. हे बिन निकाली कुस्त्यांसारखा नसतं. इथे जय आणि पराजय , दोन्ही माझाच. निर्णयसुद्धा मीच घ्यायचा. जिंकल्याच्या आनंदपेक्षा हरल्याचं दुःख सतावत राहत. पण हसण्याच कोडं उलगडत नव्हतं. निराश..
ह्या गोष्टीचा मला त्रास होईल असं कधीच वाटलं नव्ह्तं. माझ्यावरचा माझाच control कमी झाला होता. हे सगळे सहन करू शकत नव्हतो मी. काय करावे कळत नव्हतं .त्यापेक्षा फोटो आधी काढून ठेवला असता तर जास्त बरं झालं असतं असू वाटू लागलं. मी, माझ्यातला फोटोग्राफर, माझे हसू आणि माझे देव....
सगळेच निराशेच्या गर्तेत..
No comments:
Post a Comment