चांदीचे छोटेसे देव. तांब्याचा ताम्हण. मागे एक देवीचा फोटो. आणि लाकडी देवघर. एकंदरीत single colour tone च. निरांजन लावला कि एकसंध, एका रंगाचा प्रकाश पडतो. रंग वगैरे मी बघणं सोडून दिलंय. फक्त देवघर उजळतं. समोर एक उदबत्ती घर आहे. ते पण तांब्याचे. त्यात शेवटी लावलेल्या उदबत्तीची काडी अजून तशीच आहे. काही अक्षता नावाचे तांदुळाचे दाणे पण तिथेच आहेत. अजूनसुद्धा. एक छान फोटो पण येईल काढता. Sapia tone मध्ये. पण नको. मी देवाला फुल पण वाहत नाही. लाल पिवळे रंग एकत्र बघवत नाहीत आता. सात दिवसांचे पुडे आठव्या दिवशी निर्माल्य बनून बागेत जातात. तरीही त्या पुडेवाल्याला मी बंद नाही करत. का? माहित नाही. तो पण बरोबर गुरुवारी पैसे न्यायला येतो. देवाच्या फुलांचा वास घ्यायचा नसतो असं म्हणतात, पण झेंडू किंवा शेवंतीचा वेगळा वास त्रास देऊन जातो.
मी उदबत्ती पण लावत नाही. माझ्या बंद घरात त्या धुराचा जीव गुदमरतो. आणि घरात आला कि माझा. नको होतो अगदी त्याचा वास. उदबत्ती. वास. नको होतं. अगदीच नको. Room freshener मारला तरी जात नाही. रोज deo मारत असलो तरी हा वास ... नाही. नको. आठवण पण नको त्याची. खाली पडलेली राख. अगदी रांगेत पडते. माझ्या विस्कटलेल्या घरात अजिबात न शोभणारी गोष्ट. बर! उडून पण जात नाही. तिथेच. त्रास.
अश्या संथ, पण सुरेख जिंदगीत एक दिवस एक मुलगी आली आणि सगळे आयुष्य बदललं. हे सगळे खोटं आहे. असं काही होत नसतं. हम आम आदमी हैं. Mango people. असं काहीच झालं नाही. पण काहीतरी वेगळे झालं नाही तर पुढे कोणी वाचणार नाही.
नेहमी प्रमाणे घरी आलो. फुलपुडा काढला. आत आलो. कपडे बदलले, fresh झालो. देवघरापाशी आलो तर देव गायब. ओं ...मी hang . जावू दे. त्रास वाचला. तसंच बाहेर आलो. TV लावला. पण लक्ष लागेना. Channel change केला तरी नाही. काय होतंय कळत नव्हतं. आत्याला phone लावला. ती घरी नव्हती. प्रचंड चुळबूळ व्हायला लागली.
मग बुधवारी रात्री diary मध्ये सगळं मोकळं व्ह्यायला लागलो.
No comments:
Post a Comment