Tuesday, November 15, 2011

सदाफुली


तिच्या खोलीतली 
सदाफुली कोमेजली आहे .
छान हवा सुटलीये ..
संध्याकाळची …
सकाळ संध्याकाळ पाणी घातलंय .
छान सूर्यप्रकाशात ठेवलंय ..
तरी पण 
सदाफुली कोमेजली आहे …

तिच्या खोलीतली सदाफुली 
आज हि तिथेच आहे ..
रोज 3-4 फुले तरी असतातच 
पण कोमेजलेली ..

ती गेल्या वर .
खरंतर 
घरातले सगळेच उदास होते ..
अजूनही तिची खोली तिचीच म्हणून आहे ..

पण सवय झालीये सगळ्यांना आता 
तिचं सुती पातळ घेऊनच नात झोपी जाते ..
मोठा मुलगा सुद्धा अजून तिचाच अडकित्ता वापरतो 
सुनबाई, सासूबाईनचेच मसाले वापरतात .
तरीपण 
सदाफुली  ..

ती नसण्याची सवय झाली असेल सगळ्यांना 

सदाफुली मात्र अजून ,
तिचा स्पर्श तर नसेल शोधत ..
सुरकुतलेल्या हातांचा का होईना 
पण मायेचा ?
दिवसातून एकदाच मिळणारे पण 
देवाचे  निर्माल्यासह पाणी ?
इतरांना ठसका लावणारा खरा 
पण तो तिच्या मशेरीचा वास ?

आजीच्या खणात आता नातीचे bracelet असते ,
आजीच्या कोपर्यात आता मुलाचा laptop असतो ,
आजीची मोहनमाळ आता सूनबाईच्या गळ्यात असते ,
आजीची सदाफुली मात्र 
आज पण कोमेजली आहे ,
आज पण उदास आहे ..

आजीसाठी .

Sunday, July 31, 2011

मेरा कुछ सामान


भिंतीवरच्या frames, calenders, घड्याळे
सगळं काढलं,  pack केलं...
पण भिंतीवर  उरलेले पांढरे चौकोन कसे नेणार?
भिंतीवर लिहिलेलं "Life Is Crazzy" मात्र तिथेच आहे
अजून.

सगळे पंखे  Lights
काढून घेतलेत..
MSEB meter पण surrender केलाय
माझ्या बरोबर "Repeat" पेग घेणारा अंधार मात्र तिथेच आहे
अजून.

साहेबांच "मेरा कुछ सामान"
save आहे hard-disk वर
पण त्यातल्या भावना कश्या नेणार?
ते खरतर 'बहुत' तरीपण  " कुछ सामान" तिथेच आहे
अजून.

सगळं सामान  truck मध्ये load केलं
दाराला कुलूप लावलं...
पण अंगणातला जुई चा वेल कसा नेणार?
त्याचा सुगंध तिथेच दरवळतोय
अजूनही...




Wednesday, July 27, 2011

नैना लगिया बारिशा


Naina lageeyan baarishan
Te sukke sukke sapne vi pijj gaye
 Naina lageeyan baarishan
Rove palkan de kone vich neendh meri
Naina laggeyan baarishan
Hanju digde ne chot lage dil te
Naina laggeyan baarishan
Rut birha de badlan di chaa gayi


Song from the film "Anjana Anjani" and sung by "Shurti Pathak"


साला किती वेळा loop मध्ये टाकून ऐकल्या असतील ह्या चार ओळी, कडक.

Car चालवत होतो, आणि परत एकदा ह्याच ओळी ऐकू आल्या आणि मन सैरभैर झालं. भ***,
म्हणे नैना लगीया बारिशा, आमच्याकडे तर कित्येक वर्षांचा दुष्काळ होता. rather आहे.
शेवटचं कधी रडलो होतो आठवेच ना. आईचांद, न रडण्याचा इतका त्रास कधीच झाला नव्हता.

रडलो होतो, रंग दे बसंती मध्ये, लक्षण पांडे अस्लमला म्हणतो  “मैने तुम्हारे साथ, मै तुम्हे हमेशा, ..sorry.”  किती हि वेळा बघा हा shot, डोळ्यातून पाणी येणारच. No doubt. पण साला तेंव्हा मी एकटा असतो, मी माझाच  असतो. हळवं मन शांत बसू देत नाही, आणि त्याचे म्हणणे डोळ्यावाटे बाहेर पडू लागते.

But these all are imaginary things. Not the real world. खरं कधी रडलो होतो? हम्म , 8th मध्ये कमी मार्क मिळाले म्हणून, but bull shit, त्यानंतर नाहीच, damn bull shit.13 years.

का ह्याला रडायची हौस, चांगलं आहे न. all is going well म्हणून. फार कमी लोकांचं असते असं. पण मी नक्कीच त्यांच्यातला नाही, मला हि, मी हि रडावे अश्या गोष्टी घडल्या, पण नाही रडलो. जमलंच नाही, भावना बोथट झाल्या म्हणालो तर, लक्ष्य  बघताना रोशन नि त्याच्या dad ला phone केला कि हमखास पाणी येतंच येतं.  

मग काय? सगळ्यांच्या देखत रडण्याचा complex?
May be, or may be not.
Damn.
Shit.
काय त्रास आहे ..
&^%$

आजी गेल्यावर आजीचा लाडका नातू शांत होता, कोरडा होता.

Rove palakande kone wich neend meri.

Break up झाल्यावर, कोरडे डोळे photo शोधात हिंडत होते, एकटेच.

Hanju digde ne chot lage dil te.

जाम  frustrate झालोय यार ..गच्चीत गेलो, मोठ्याने रडता येईल म्हणून,
नाही.
Shower खाली उभा राहिलो,
नाही. 
Max.



माहित नाही किती वेळ गेला, bell वाजली, सुन्या होता.
आणि एकदम मी त्याच्या खांद्यावर डोके ठेवून रडलो. माझा control च नव्हता माझ्यावर. कसं काय एकदम झालं, नाही कळलं मलाही.


हीच कमी होती का? एका खांद्याची?, ज्यावर डोके ठेवून शांतपणे रडता येईल? Yes.एक  hug,. तो एक खांदा Now I feel jealous, जे मस्त मध्ये रडू शकतात, कारण कोणतही असो, मनसोक्त रडू शकतात.
त्यांच्याकडे एक खांदा असतो डोकं ठेवायला.
रडायला .


Rut birha de badlan di chaa gayi







Thursday, July 7, 2011

Arrange marriage ह्या विशेष अवघड प्रकारात, मुली जेंव्हा चहा पोहेच्या ऐवजी CCD or BARISTA ला भेटू म्हणतात तेंव्हा खरंच हायसं वाटतं. अश्याच एका भेटीसाठी, रविवारी संध्याकाळी BARISTA ला पोचलो. छानच गर्दी होती. एक table मोकळे झाला तसा लगेच जाऊन बसलो.

मुलगी यायची होती.

रविवार असल्यामुळे  बरीच  गर्दी  होती . नशिबानी  जागा  मिळाली  होती. मी  आपला  उगाच  mobile खेळत  होतो . तिला  एक  msg टाकला.
तेव्हढ्यात एक मुलगी आत आली. Typical बडे बाप कि लडकी वाटत होती. काहीतरी लिहिलेला  t shirt, हातात mobile इतर इतर, जाहीरपणे न सांगण्यासारख्या बर्याच गोष्टी..
‘ताई’ सरळ समोर आल्या. (माझे लहानपणा पासूनच एकदम पवित्र विचार. परस्त्री माते समान. dad का खुश व्हायचे ते आत्ता कळतंय.)
“हम्म!, प्राष calling, go to hell.” माझी डावी भुवई कधी वर गेली मला कळलच नाही.
Phone cut केला बहुतेक ..
“are u alone?”
माझ्या उत्तराची अपेक्षा न ठेवता, हातातलं कोणतसं इंग्लिश पुस्तक table वर ठेवलं, त्यावर  mobile आणि  ‘ताईसाहेब’ समोरच्या  खुर्चीवर स्थानापन्न.
“वाह !”
“alone च काय single पण आहे.” आमचं आपलं मनातल्या मनात.
“काय नाव असेल हिचं? बाप काय करत असेल?”
परत phone वाजला.
“प्राष …” उद्गारवाचक असते तसं चीत्कारवाचक किंवा असच काहीतरी प्रकारे ती म्हणाली ..
“hello…”
“Hello..” आमचं आपलं मनातल्या मनात.
“niranjan please, I told you. Go to hell. I don’t wanna talk to u. ..” वैताग, चीड चीड असं mixture होते आणि phone खटकन खाली ठेवलं .(landline आपटण्याचे सुख mobile मध्ये नाही.), पण खरच मुली चिडल्यावर (जो वर त्या आपल्यावर चिडलेल्या नसतात तो वर ) छान दिसतात.

'निरंजन चे टोपण नाव प्राष कसं काय असू शकतं?' समोरची मुलगी current मध्ये एकटी आहे, पण मनात प्रश्न  चुकीचे येतात. कोण काय करणार?
जाऊ दे, आपल्याला काय  करायचं? पण मी ज्या मुलीला भेटायला आलो होतो ती मुलगी पण येत नव्हती आणि तिचा reply पण.

समोरच्या 'ताई' परत पुस्तकात डोकं घालून बसल्या. प्रत्येक बोटाला वेगळ्या रंगाचे nailpolish. हातात पिवळ्या रंगाचं काहीतरी होतं. Table वर कोणता तरी बडा phone. आणि  पायात वेताच्या चपला. Full trendy.
“वाह”
बोलायला सुरवात कुठून करावी? श्या! पल्ल्या कडून शिकायला पाहिजे होते. च्यायला एव्हढ्यात मला भेटायला येणारी मुलगी आली तर? पण साला नाक काय आहे. आह! अरेय हि तर समोर पण बघत नाहीये. काय त्रास आहे. कशी सुरवात करावी? कशी सुरवात करावी?

“sir, what would you like to have?” waiter..वाह आता तरी संपर्क होईल ..
“no, thnx” काहीही.no thnx काय म्हणलो मी .आवरा.
“and for mam?”  हा प्रश्न मला होता! ‘ताई’ अजून डोकं पुस्तकातच घालून होत्या. मी आपला मनातल्या मनात वाक्य जुळवायला लागलो, आम्ही दोघे वेगळे आहोत, तिचं तिला विचार …
“one black coffee for me.” मुलगी खरच अष्टावधानी होती. पण समोर न बघता उत्तर. आमचा पोपट.

काय त्रास आहे..
How to Break the ice, hoe to break the ice..
देवा धाव रे मला पाव रे.

आमची अंडू गुंडू ringtone वाजली, तशी ‘ताई' नची नजर वर आली.(काहीही वाक्य आहे, नजर वर काय आली? पण ठीक आहे आली तर आली.)
“आई …अहह !” मनातल्या मनात..
मला भेटायला येऊ घातलेल्या मुलीचा होता.
“मेलो” मनातल्या मनात.
“hello.”
“अरेय एक prob आहे. अरेय आईची तब्येत एकदम बिघडली आहे, जरा doctor कडे आले आहे. इथलं झालं कि phone करेन. Please ..sorry बरका रे..”
सासूबाई जावयाच्या नुसत्या नावानी आजारी पडल्या होत्या. काय सुख आहे?
“na, its fine.” Actually “ookeyyy” पण ह्या वेळेस मात्र योग्य तेच उत्तर बाहेर आले..
Phone ठेवला तसा, ‘ताई’नी  मान परत वर काढली.

“excuse me.” मी already सातव्या आसमान मध्ये पोचलो होतो.
“yes.” आयुष्यात चेहऱ्यावर सज्जनपणाचा भाव आणण अवघड असते. आणि तसे भाव आणल्यावर आपण मठ्ठ  तर दिसत नाही न  (खरंतर बावळट च) हे जरा आरशात बघून ठेवायला हवं होता.
“your ring tone…its…”
“ actually, I don’t know the film.” काहीही, प्रश्न  पूर्ण व्हायच्या आधीच ..आवरा ..control control..
“नाही, but its in some south Indian langaugen u don’t look south Indian from any view..”
माझ्या दोन्ही भुंवया already वर होत्या.  stumped, का आनंदी सांगता येणार नाही पण thnx to all my हितशत्रू , ज्यांनी मला मिशी उडवायला सांगितली ..
“sorry, I mean ur ring tone is nice…would u just send me?”
Ringtoneच काय?..सुस्कारा …
“मी शांत पाने Bluetooth ON केलं.
Searching for device
“सच?” (such )
“सच नाही, सुच, सुचित्रा पानसे.”
 सुचित्रा पानसे?. मी खरच ह्या नावाचा विचार केला नव्हता.  नाही म्हणायला प्रियांका वगैरे हिंदी कम मराठी नाव आली होती, पण सुचित्रा पानसे?
“पानसे ” सदाशिव पेठी or SP college च्या accent मध्ये, आणि नेहमी च्या आडनाव घ्यायच्या style मध्ये मी   बोलून गेलो ..
“shit sorry, I mean मी पण मराठीच आहे, just accept it. Song..”
“उउम्म ?” पण song म्हणाल्यावर हसली..
मेलो यार. कोणाला तरी हे सांगायचे आहे..आत्ताच्या आत्ता ……

सुचित्रा पानसे,  मराठी मुलगी. Smart, आत्ताच निरंजन कम  प्राष, काहीही आवरा, शी  भांडण झालाय, ओळख नसताना माझ्या समोर बसलीये,केवळ photogenic यार. मला सांगून येणारी मुलगी येणार नाहीये, माझी आवडती ‘black कॉफ्फी'च  order केलीये आणि मी  spell bound होऊन बघत बसलोय ..

गाणे तर send झालाय, What to do next?



Sunday, June 26, 2011

Chandr



मला चंद्र आवडतो.

स्वयंप्रकाशित नसला,
तरीही प्रकाशमान .
असं वाटत कि माझे सगळं म्हणण
तोच ऐकून घेतो.
एकही शब्द उलटा reflect न करता 
सच्च्या दिलानं.

मला अमावस्येचा चंद्र आवडतो  
स्वतःचं अस्तित्व न दाखवणारा 
ध्रुवा पेक्षाही अढळ.

अमावास्येच्या रात्री मी मुद्दामहून गच्चीवर जातो 
त्याला शोधायचा खूप प्रयत्न करतो 
त्याला खूप काही सांगायच असतं 
मी सांगून मोकळा होतो 
तो मात्र दिसतच नाही 
तरी पण असं जाणवत राहत …कोणीतरी ऐकतय 

मग मला प्रतिपदेची कोर आवडली ..
“मी आहे ”.असं सांगणारी 
पण छोटासी ती  ..माझं सगळ ऐकून घेईल का?
मग द्वितीया…तृतिया ..
अष्टमी ..perfect half
पण मन भरत नाही.

मग वाटलं पौर्णिमेचा चंद्र खरा .
कसा एकदम प्रकाशमान 
पण एव्हढ्या प्रकाशाचा त्रास होतो 
मी सच्च्या दिलानं त्याला सांगू शकत नाही.

मला अमावास्येचाच चंद्र आठवतो 
स्वतःचं अस्तित्व न दाखवणारा 
तरीही तिथेच असणारा 
माझं सगळं ऐकून घेणारा….
सच्च्या  दिलान …

Tuesday, April 12, 2011

I hate sms

sms 1 : "C u al @ Vaishali, 2mro evn 7"
            

sms 2 : "Best of rajni....."
          
sms 3 : "Hey! wats up?"
            "Wachin TV"
            "What?"
            "HBO, Blood diamond."
            "Cul"
            "U?"
            "Man vs Wild, sahara wala episod."
            "Bear grils, awara tyala."
            "Bhari ahe to."
            "Hmm"
            "Feelin sleepy?"
            "Ya,"
            "K, udya sakali, NM."
            "Cu"
            "Gntc"      
             

sms 4 : " Navin warsh tumchya ayushyat.........."
             
sms 5 : "leko, ratri coffee?
             pal, KP, TP, DB, Guruji"
             
sms 6 : " We had a baby boy, FYI, c u soon."

           
sms 7 : " Na seriously, wen i think of such things, mind gets upset. but wat u said is rt. i'll try.                                
           thnx. nice 2 talk 2u"

sms 8 : " Reminder!!Sunday 19/02, engmnt ahe, 6pm santosh hall. waiting 4 u all."
           

sms 9 : " i know dis is not done, pan tu samor asalas ki bolayala jamanr nahi,
              I LOVE YOU.."

            I HATE SMS




.

Sunday, March 27, 2011

Next

बर्याच दिवसांनी भेट होतीये ..last time we met was with invisible..माझे आणि पिल्लूच थोडसं भांडण झाले होते. I was online अन मग थोडीसी माझी गम्मत झाली होती. त्यानंतर बर्याच काळानी आज परत  मी  इथेच  आलोय.

Obviously आमच्यातला वाद काही जास्त काळ टिकला नाही. Thanks to her. फारच समजूतदार आहे ती. Especially माझ्यासारख्या आगाव मुलाबरोबर राहायचं म्हणजे .

पिल्लूची  practicals झाली होती. PL सुरु  झाली  होती .

“ आमच्या घरी आहे न, सारखं कोणी न कोणीतरी येत असते. अगदीच कोणी नाही तर, दर तासाभरानी आई  येते. मी काय करतीये बघायला. जाम सटकते माझी. मी उद्यापासून तुझ्या घरी येणार आहे अभ्यासाला. तू office ला गेलास कि, शांतता मिळेल. आणि कामवाल्या मावशी आल्या कि तेवढाच time pass पण होईल. Plus संध्याकाळी समोरच्या garden मध्ये गेले कि फ्रेश पण होईन. Best best. उद्यापासून इथेच अभ्यासाला.” पिल्लू  plan सांगून मोकळी झाली होती. Last year chi exam होती. मला पण तिचे म्हणणे पटले.

दुसऱ्या दिवशी office ला जायला निघालो तोपर्यंत तर  madam चा काही पत्ता नव्हता. नेहमी प्रमाणे सकाळचे काही routine  phone झाले होते, “ मला यायचे तेंव्हा मी येईन. माझ्याकडे किल्ली आहे. U go na!”

Office मधून दोन phone केले. पण switch off. बहुतेक अभ्यास करत बसली असेल . मी पण जास्त tension घेतले नाही. मला तिची style आता माहित झाली होती. संध्याकाळी  परत आलो. Madam झोपल्या होत्या. Latch उघडून आत आलो तर मावशी आवरून गेल्या होत्या आणि ही शांत झोपली होती. मी पण तिला उठवले नाही. कंटाळली असेल. मी जरा जास्तच समजूतदारपणा दाखवत होतो. Bedroom च दार लावून घेतलं आणि TV बघत  fresh झालो. तेव्हद्ढ्यात  phone वाजला. आणि त्या  आवाजांनी पिल्लू उठली.

“ जबरदस्त. तुमचे घर फारच शांत आहे. आणि तू नसल्यावर अजूनच शांत वाटते. काय झोप लागते.”

“madam आपण अभ्यासासाठी आला आहात. झोपायला नाही ”

“एए  please बरका. आईसारखं बोलू नको. 21 तारखेला पहिला paper आहे. तोपर्यंत सगळे cover करायचे आहे. U know मी काय काय दंगा केलाय वर्षभर.”

“आणि तरी दरवर्षी first class. Sorry, distinction. आमच्या घरात शोभत नाही. आम्ही सगळे काठावरले लोक आहोत.”

“हम्म. Please चहा कर ना. जरा झोप उडेल. तोपर्यंत जरा ती बदनाम मुन्नी बघते काय म्हणतीये. अई सल्लू कसला भारी दिसलाय न मिशीमध्ये. म्हणे हूड हूड दबंग दबंग ..”

झोपेतून उठल्या उठल्या ही ON झाली होती. कसे काय जमत मुलींना देव जाणे. बाहेरच जेवायला जायचे ठरले. तेवढ्यात तिनी एक lesson संपवला. हे English medium वाल्यांचे काहीतरी वेगळच असते. Ek lesson संपवते. जेऊन आल्यावर परत अभ्यास. Solid hard working आहे पोरगी. मानला यार, नशीब आई बाबांच्या बेडरूममध्ये अभ्यासाला बसली होती. (obviously माझ्या खोलीतल्या पसार्यात बसायला जागाच नव्हती) मी माझ्या bedroom मध्ये झोपायला जायला निघालो.

“coffee?”

“उम्म ? नको. नंतर .” पुन्हा अभ्यासात मग्न .

तासाभरांनी पांघरूण कोणीतरी ओढतंय असं वाटले. डोळे उघडले तर समोर madam.

“झोपेत कसला innocent दिसतोस रे. so cute. असं वाटत होते उठवूच नये. पण coffee तयार आहे. उउठ .”

“आं! मारतेस का ?, उठतोय न .”

“झोप उडायला नको का ?”

रात्री झोपेतून उठवून coffee पिण्याचा पहिलाच प्रसंग होता. पण pillu is best. काय coffee होती. जरा गप्पा मारल्या. मग म्हणालो “चल जास्त रात्र व्हायच्या आत तुला घरी सोडतो. उद्या परत ये सकाळी .”

असं नव्हते कि पिल्लू आधी कधी आमच्या घरी राहिली नव्हती .. but it was her exam time I didn’t want to  make it more complicated with काय problem आहे इथे राहिले तर ?, or मी असं का म्हणतोय ह्याच कारण देऊन. पण गरजच पडली नाही. पोरगी खरच समजूतदार आहे.

“खरच, उद्या तुला office आहे. मी घरी जाऊन अजून एक lesson संपवेन आणि मग झोपेन.”

तिच्या घरी गेलो तर lights already बंद होते. नेहमी hug करणारी पोरगी just bye म्हणून गेली. Exam pressure जाम आलं होते? .का राग अजून उतरला नव्हता? का मनात काहीतरी वेगळेच होते?.पण माझ्या मनातून अजून invisible च्या वेळेचा झालेला त्रास जात नव्हता. पण exam म्हणून मी शांत होतो.

सकाळी डबा करायला मावशी आल्यावर त्यांना म्हणालो, “रात्रीसाठी दोन पोळ्या जास्त करून ठेवा. आणि भेंडी नको रात्रीसाठी,. कोबी रात्रीला ठेवा. भेंडी आत्तासाठीच करा.”

“ताई येनारेत का? हान! काल दुपारच्याला झोपल्या व्हत्या म्या आले तवा. दादा लगीन केलेत कि काय ? आमास्नी न्हाई बोलावलात.”

“मावशी मी दादा असेन तर ताईशी लग्न होईल का? आणि तुम्हाला नक्की बोलवणार. आई बाबा पण येतील तेंव्हा. तिची exam आहे . Paper आहेत तिचे. परीक्षा परीक्षा म्हणून येते अभ्यासाला.

बाप रे! बायका खरच अवघड असतात.


संध्याकाळी यायला उशीरच झाला. घरी आलो तर ‘ताई ’ ओट्यावर पाय हलवत बसल्या होत्या.आणि हातात दाणे. शेजारी मावशी पोळ्या करत होत्या. मला काहीच कळत नव्हते, माझ्या घरात काय चालू आहे.

“दुपारी मावशीच म्हणाल्या, मी रात्री परत येते, 4 पोळ्या आणि भाजी काय 15 मिनिटात होते. माझ्याकडे डोळे मोठे करून बघू नको. हो कि नाही मावशी?”

“व्हय दादा. ताईनला पण बरं वाटेल गरम गरम खाऊन.”

“उह्म्म,.thnx”..

मला खरच काय बोलावे कळत नव्हते. नेहमी latch उघडल्यावर वाटणारा एकटेपणा एका पोरीमुळे कुठच्या कुठे गेला होता. Invisible चा त्रास होत होता का त्रासाचे एक एक कारण जाणवत होते?. पण मी शांत होतो.

¾ दिवस असेच गेले. रात्री गरमा गरम जेवण. मग एक night walk. पण कधी तिनी हात धरला नाही. Then माझ्या साखरझोपेत एक गोड coffee आणि मग रात्री hug न करता bye तिच्या दाराशी. पण मी शांत होतो.

असाच return drive करत होतो, “kay re, gharat andi nahit? Yetana gheun ye. Aaj mavashi yenar naiyet. Tuzya haatchi bhurji khayachi ahe. Bread milala jagadamba walya kade.” Sms

घरी आलो तर madam आंघोळ करायला गेल्या होत्या. Fresh झालो. तोपर्यंत आतून आवाज आला होता अर्धा तास म्हणून. मी सरळ कांदा चिरायला घेतला. डोळ्यात पाणी आलेले, भुर्जी तयार झाली आणि पिल्लू बाहेर आली.थोडं गार वाटते म्हणून माझे jacket घातले होते,  with hood. आणि त्याचवेळेस महावितरणनि (mseb) कृपा केली.

“thank god आताच light गेले. नाहीतर अभ्यासाची पंचाईत झाली असती.”

Table ready होते, कंदिलाच्या  case मध्ये मेणबत्ती लावली.glass table, candle light आणि डोक्यावर  hood…अवघड . जोरात  श्वास घेतला ..camera तसाच आत शांत होता आणि मी बाहेर शांत होतो ..

दिवस असेच चालले होते. मावशी संध्याकाळी येत नव्हत्या ..स्वताहून का सांगण्यावरून माहित नाही ….पण संध्याकाळचं गरम गरम जेवण बनवत होतो, दोघही ..सकाळी जाताना माझी खोली आवरून ठेवायला लागलो होतो…का सांगता येत नव्हते. बरेच बदल होत होते, जाणवण्याची कमी होती. माझे तर डोळे जाम उघडे होते ..हम्म . तरी  invisible दाखवण्याचा  प्रयत्न  करत होतो ..

परीक्षा पण चालू  झाल्या  होत्या . मी  नसताना  पूर्ण  अभ्यास , सायंकाळी park मध्ये  fresh व्हायला  20 min आणि  नंतर  जेवण  बनवतानाचा  break..बस  बहुतेक  पहिले  यायचा  विचार  होता . जेवण  बनवताना  break कसला . मला  revision ऐकावी  लागायची . मग  कधी  तरी  एकदम  मजाक  करायचो . मग  मला  फटके  पडायचे . समोरच्या  खिडकीतून  देशमुख  काकू  सगळे  बघत  असयाच्या ..आणि  मी  शांत  राहयाचा  प्रयत्न  करत  होतो .

“बस ..आता  बस  ..जाम  कंटाळा  आला . आताच  घरी जाते , छान  झोपते . अरेय  उद्या  माझा  paper   नाहीये . पण  तुला  सुट्टी  आहे  न ? plan काय  आहे ? तू  घरी  असलास  तर  माझा  अभ्यास  नाही  होणार . एक  काम  करू  दुपारी    मस्त  picture बघू ..”

काय  डोक  चालत होते . मी  picture टाळला .

“मी  दुपारचे  जेवण  झाल्या  वर  भटकून  येईन . बरेच  दिवस  झालेत ..पाऊस  पण  येऊ  बघतोय  त्या  आधी  bright lite photography try मारतो .”

“हम्म ”

दुपारचे  जेवण  झाले , मी  camera bike helmet पाणी  नि  i-pod, महत्वाच्या  5 गोष्टी  घेऊन  बाहेर  पडलो .  सरळ  पायाखालचा  रस्ता  पकडला . मुठा  घाटात  गेलो . तिथे  एक  पार  आहे , झाड  कसले  आहे  माहित  नाही  पण  जागा  बाप  आहे . समोर  दरी  शेवट  पर्यंत …त्या  जागी  साहेबांचे  ‘अब  तो  आओ  साजन ’ गाणे  ऐकणे  हे  ठरलेला ..प्रथा  पार  पाडल्या …पण  राहवत  नव्हते .किती  दिवस  स्वतः  पासून  invisible राहणार होतो ?

Dad ला  phone केलं ..त्यांच्या  कडे  किती  वाजलेत  विचार  न  करता   .

“काय  झाले ? अरेय  किती  वाजलेत ?”

“dad, आईला  पण  उठवा. मला  बोलायचे  आहे . Speaker phone ON करा …आई  , dad, for last few days आम्ही दोघे एकत्र राहतोय. means रात्री  झोपयला ती तिच्या घरी जातेय पण,  मी  नाही राहू शकत तिच्याशिवाय .. फार त्रास होतोय आता..नाही शांत बसू शकत आता ..please help me. Please या इकडे. मला  लग्न करायचा आहे तिच्याशी.”  डोळ्यात पाणी कधी आले मला कळलं नाही. आई बाबांना मी कधीच सांगितले नव्हते पण ते पिल्लू ला ओळखत होते आणि सगळे जाणून होते.विशेषत मला ओळखत होते or ओळखून होते.

“ आई मी OK आहे ..just तुम्ही कधी येत आहात ते सांगा,  I’ll arrenge everything, but I cant handle this anymore. मी नाही राहू शकत आता तिच्याशिवाय.”

“पण did u told her about your concept of being in live-in-relationship? Are her parents OK with that?”

“तिला माहित आहे, but I don’t care dad, go to hell with that live-in-relation and all that. मी काहीही करायला तयार आहे. Sorry आता ती एकहि दिवस नसेल तर मी नाही राहू शकणार. तिची सवय होण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. I cant frame it exactly. Pan I am ready to marry her in any way she want to.”

हसण्याचा आवाज आला, “ बर आता नाव तरी सांग तिच ?”

“ dad please”

“नाही तुझ्या तोंडून ऐकायच आहे ”

“आवरा …”

“we will talk to her parents, but 3 महिने असतात न  register  marriage साठी ? Fix next 3 months we will be there..get my son ready.”

Phone cut केल, शांतपणे पारावर मान मागे करून टेकवून बसलो. आता हा शांतपणा किती हवाहवासा वाटत होता? सुन्या म्हणाला होता तिला propose कर ..आता ती इथे असती तर?

वेळ काढायचा होता..सुन्याचा नावावर cursor  नेला ..पण call नाही केला. परत  phone  आत ठेवला.  Head set लावले तर पुढचे गाणे सुरु झाले होते ‘का करू सजनी ’

नाही आठवत आता वेळ कसा घालवला. घरी येता येता calculation करत होतो. Last paper कधी आहे?. त्यादिवशी propose करू . काय खास करता येईल? Red rose, chocolate? कविता ? Candle lite?..बाप रे …काय  बोलेन मी? बोलायचं काही उरलं  होते का?

चांदणी चौकात सूर्यास्ताचे काही ठराविक photo काढले.. घरी आलो तर light बंद होते. Bike लावली helmet काढले, शंकेनि डावी भुवईवर गेली होती.. latch उघडला आता आलो, hall चा  light लावला. Kitchen मध्ये आलो तर glas table वर परवा सारखच कंदिलाच्या case मध्ये मेणबत्ती लावली होती, table पाशी परवाचेच hood चं  jacket घालून पिल्लू बसली होती.

“परवा अश्याच  light मध्ये तुझ्या डोळ्यात सगळे दिसत होते, नाही जमत तुला माझ्यापासून काही लपवून ठेवणे ..

(उठून माझ्या जवळ आली, माझा हात धरला होता, माझ्या पाठीवर camera sack आणि पाण्याची bottle तशीच  होती. थेट डोळ्यात बघत बोलत होती. नेहमीच्या style मध्ये डोळे छोटे करत, नाक उडवत म्हणाली)

Please….”

And we hugged..


हसण्याचा आवाज आला,  माझ्या bedroom मधून सुन्या आणि मैत्रीण आले. मी आणि पिल्लू  normal होतो आणि मैत्रीण रडत होती.

मी पिल्लूकडे पहिले, “तुझी परीक्षा चालू आहे न? काय चालू आहे ?”

“आवरा यार ह्याला. तू कसं काय ह्याचा बरोबर राहणार?” सुन्याची मैत्रीण अजून रडतच होती .

“ माझी परीक्षा कालच संपलीये, मी माझ्या खास मैत्रिणीसाठी थांबले होते, आणि bye the way आई बाबांचा phone आला होता दुपारी मला …तुमचे INVISBLE plan कळलेत मलापण.”


NB: सांगण्यासारखा बरेच घडलंय ..पण actually ते सगळे enjoy करत होतो. थोडी मजा, थोडा त्रास, tension सगळे. माहित नाही जसा अनुभवलंय तसा सांगता आले आहे कि नाही or ते तितक्या प्रभावी पणे मांडता आले आहे का नाही! पण तरीही.
माझे  life खरच बदलत होते ..एका मुलीमुळे माझ्या डोळ्या देखत.completly visible}

Friday, March 25, 2011

अर्थ


हल्ली मी तिच्याविषयी काहीच बोलत नाही,
ह्याचा अर्थ मला तिची आठवण येत नाही
                                             असा  नाही.

Phone उघडून wallpaper पाहतो 
सरळ phonebook मध्ये 
तिच्या नावापाशी जाऊन थांबतो.
Call आणि  back अश्यादोन  बटनांवर 
अंगठा खेळत राहतो.
शेवटी back बटन जिंकतं आणि
मी call न करता phone बंद करतो.
ह्याचा अर्थ मला तिच्याशी बोलायचं नसतं 
 असा नाही,
ह्याचा अर्थ मला तिची आठवण येत नाही
                                             असा नाही.



तिचा वाढदिवस जवळ आला कि 
मी gift shops पालथी घालतो 
कधीतरी एखादं  gift घेऊनहि येतो.
माझ्याकडे तिचा address असतो 
DTDC 24 तासात पोचवायला तयार असतं.
तरी ते  gift मी पाठवत नाही
ह्याचा अर्थ मला तिचा वाढदिवस लक्षात नाही
       असा नाही,
ह्याचा अर्थ मला तिची आठवण येत नाही
                                             असा नाही.



चुकून कधीतरी तिचाच  phone आला तर 
मनातून मी कचरतो.
तिचा phone rcv करतो.
काही गोष्टी बोलतो 
काही गोष्टी टाळतो.
ह्याचा अर्थ मला तिला टाळायचं असतं
 असा  नाही,
ह्याचा अर्थ मला तिची आठवण येत नाही
                                             असा  नाही.


सरतेशेवटी अशक्य अश्या डोंगरकड्यावर 
उभा राहून मी तिला phone करतो.
तेंव्हा मी माझाच असतो.
ती जागा…तिची आठवण..सगळ्या गोष्टी त्रास देतात.
शेवटी मी जाणून बुजून बोलून जातो 
“आपण आता कधीच भेटणार नाही ”
दोन्हीकडून शांतता .


ह्याचा  अर्थ….

ह्याचा अर्थ.






Friday, March 11, 2011

निबंध

शाळेत असताना सर्वात आवडती गोष्ट 'खेळ'. कोणीपण सांगेल.पण त्यानंतरची आवडती गोष्ट विचारलं तर (विचारलं तर न?) निबंध. (may be म्हणूनच हा त्रास होती आता तुम्हाला.) पण असो.
मी बोलतोय ते अगदी तिसरी चौथीतले निबंध.माझी शाळा, माझा भाऊ, माझा कुत्रा, दिवाळी, राखीपोर्णिमा, १५ ऑगस्ट इत्यादि इत्यादि. असले विषय. ठरलेले.

irrespective of school, medium of learning, gender, society of student, his parents... शेवटचे वाक्य fix,
"म्हणून मला माझी शाळा/ माझा भाऊ/ माझा कुत्रा/ दिवाळी/ राखीपोर्णिमा/ १५ ऑगस्ट आवडतात."
yes !  हेच वाक्य. कोणालापण विचारा. हेच ते.


आणि तुमच्या परमभाग्याचा क्षण हा आहे की मी ह्यावर काही टिपण्णी करणार नाहीये..


हा माझा blog आहे. मी इथे काहीही लिहू शकतो. कसंही लिहू शकतो. कधीही लिहू शकतो.
आणि म्हणूनच "मला माझा blog खूप आ व ड तो."

जय हिंद! जय भारत!

( चौथीत १५ ऑगस्ट ला जोडून राखीपोर्णिमा आली होती. सगळ्यांनी १५ ऑगस्ट वरच लिहिले होते. मी मात्र मुद्दामहून राखीपोर्णिमा घेतला होता विषय. निबंध वाचून दाखवण्याची वेळ होती. आणि म्हणून गेलो होतो, "म्हणून मला राखीपोर्णिमा खूप आवडते, जय हिंद!जय भारत!" मग फक्त हशा.)





Thursday, February 24, 2011

लागी कलेजवा कटार

Actually एकदम जुनी story आहे. आज अचानक आठवण झाली. लिहायचा मूड होता. म्हटलं बघू स्टोर्या सांगायला जमतंय का?

मी आणि सुन्या त्याच्या scooty वरून फिरायचो तेंव्हाची गोष्ट आहे.सुन्या गाडी हाणायचा आणि मी मागे बसायचो.

So basic point is story.

सुन्याचा घरी phone आला. मी नवीन कॅमेरा explore करण्यात गुंग होतो. आईनी फोन घेतला. (आई बाबा त्यावेळी india तच होते.)
"काही नाही काकू, त्याला फक्त सांगा परवा संध्याकाळची, actually रात्रीची तिकिटे काढली आहेत. 'कट्यार'ची. यशवंतरावला आहे. पुढून पाचवी रांग आहे." 
नाही म्हणायचं काही कारणच नव्हते. संगीत नाटक होते म्हणून नाही, पण काळच नाही म्हणायचा नव्हता. एकत्र भटकणे हाच उद्देश असायचा.मग ते coffee shop असो, टेकडी असो किंवा picture, नाटक असो. सुन्याला माझ्या कॅमेरात रस नव्हता म्हणून त्याने फोन करायची तरी तसदी घेतली. नाहीतर direct घरी टपकायचा.

नाट्यगृहात पोहोचलो तर दुसरी घण्टा झाली होती. E११-१२ तिकिटे होती.पुढे गेलो तर already video शूटिंगवाले कॅमेरा सेट करून उभे होते.
"सुन्या जागा चुकली, हे लोक वैताग देणार."
"नाटकंच तुझी लई. तू आत बस, मी बाहेर बसतो. आणि नाटक सुरु झाले कि काही जाणवणार पण नाही."

नाटक चालू झाले. regular interval नि गाणी चालू होती. खान साहेब येत होते, त्यांचे शिष्य येत होते आणि गाऊन जात होते. मधुनच माझे लक्ष त्या video शूटिंगवाल्यांकडे जात होते. चेहऱ्यावर stage वरचा पडलेला प्रकाश आणि dark backgroung , छानच फोटो आला असता.

साधारण इंटर्वलच्या थोडं आधी, exactly आठवत नाही, पण खान साहेबांनी गाणे सुरु केलं, "लागी कलेजवा कटार ". आणि सुरुवातीलाच टाळ्या घेतल्या.काय गातो तो माणूस. भारीच.
"लागी कलेजवा कटार...." ह्याच ओळी वर ३-४ मिनिटे गेली असतील. नेहमीप्रमाणे आलाप आणि इतर गोष्टी चालू होत्या. पण सगळ्यांचे लक्ष खिळवून ठेवले होते.
" सावरिया...सावरिया से हो गये.." उलटून पालटून तीच ओळ चालू होती, खरं तर कडव्याचा climax होता, आणि पुढची anti climax च्या ओळी साठी सर्वजण आतुरले होते.


"सावरिया...सावरिया से हो गये! "                                   हि ओळ चालू असताना माझे लक्ष परत त्या 
                                                                                   video वाल्यांकडे गेले तर, एक मुलगी तिथे होती
                                                                                    आणि मुन्नाभाई style मध्ये  तिनी 
                                                                                    लट कानामागे टाकली.  आणि माझ्या 
                                                                                    तोंडून 'वाह' गेली. पूर्णपणे offbeat . आणि  
 "हो गये  नैना चार!"                                                             तिनी माझ्याकडे पाहिले.



"लागी कलेजवा कटार...."


आयुष्यात विसरू शकणार नाही असा प्रसंग आहे. जाम shot डोक्यात बसलाय.

काल घरी जाताना वसंतरावांचं लागी कलेजवा कटार चालू होते, आणि किस्सा आठवला. just shared .

Friday, February 18, 2011

UNPOST


  1. हा 'अ' साला वैताग देतो. परवा मला म्हणाला, मी हे जे काही लिहितो ते अजून घरी सांगितलं नाहीये. Better तू पण चुकुनही बोलू नकोस. त्यांना ह्यातलं अजून काळे अक्षर माहित नाहीये.

“ अरेय, as far as I know, हे सगळे तर तुझ्यात त्यांच्याकडूनच आलंय. Photography, लिखाण basically art तुमच्या घरात मी आधीपण पाहिलीये. I was happy that ur following their steps. Rather they also will be happy to know that ur on these lines. सांगून टाक कि त्यात काय?”

“खरंय. पण माझ्यासाठी ते तितकंसं सोपं नाहीये. बहुतेक एक प्रकारचा complex माझ्या मनात असेल कि आपण करतोय ते त्यांच्या अपेक्षा पुरे करणारे नसेल. बहुदा मी ते उगाच complex करतोय. पण नाही यार. ते एव्हढं lightly घेणार नाहीत. त्रयस्थ नजरेनी बघू शकणार नाहीत. ह्यानी हे असंच का लिहिलंय ह्याचा अर्थ काढत बसतील आणि स्वतःला त्रास करून घेतील. म्हणून may be me सांगत नसेन.”

'अ'  ची अजून हिम्मत होत नाहीये हे सगळे घरी सांगायची. कारणे काही असतील, पण हे सगळे अजूनही त्याच्याच मनात आहे.  

UNPOST!

  1. पिल्लू ह्याचा blog वाचत नाही. “मी असलं सगळं वाचलं तर तुझ्या प्रेमात पडेन” म्हणते. आणि त्रास मला. 
“काही अर्थ आहे का ह्याला? मग आत्ता काय तुझ्या प्रेमात नाहीये का? आवरा यार दोघांना.”
“अरेय प्रश्न ती आता माझ्या प्रेमात असणे नसण्याचा नाहीये, पण त्यामुळे INVISIBLE च्या वेळेस मला झालेला त्रास अजून तिला कळला नाहीये.”
“कळला नाहीये, बोले तो, तू सांगितलं नसशील. पण काय गरज आहे सांगायची. U know she loves u, she knows u love her, अजून काय पाहिजे? नसत्या गोष्टी माहित होऊन काय फायदा? Means मला तर काही गरजच वाटत नाहीये सांगायची. बघ as u wish”

'अ' ला जे वाटतंय ते हेच असेल, मी त्याला आता ओळखायला लागलोय. म्हणूनच तो सांगत नसेल तिला. मला नाही वाटत तो कधी सांगेल तिला. साला  seriously hurt आहे, पण तितकाच प्रेमातपण आहे. म्हणूनच हे सगळे अजूनही त्याच्याच मनात आहे.

UNPOST!

  1. third story 'अ' ची  नाहीये. हे माझ्या मनातलं आहे, त्याच्या मार्फत मी बोलून दाखवतोय.
“मला  thnx म्हणायचं.”
“bull shit, तुम्ही बोलत नाही आता, आणि thnx कसले म्हणतोय. आणि मला विचारशील तर बोलू  पण नको आता. No point in having any kind of …! f*** you, thnx म्हणतोय.” 'अ' जाम भडकला होता.
“अरेय, मला आमच्यात झालेल्या वादाला thnx म्हणायचं.”
“वाद. नानाची टांग तुझ्या. एक शब्द तरी निषेधाचा बोललास का?”
“हम्म , वाद नसेल, पण ज्या काही प्रकारे we separated, मला खूप विचार करायला शिकवून गेले. स्वताचा. त्या style ला thnx म्हणायचं.”
“आणि झालेला त्रास, तुला. May be एकट्याला.”
“त्रास झाला. Fine. पण आता मागे वळून पहिले कि वाटते, it made me really to see myself from diff angle. शेकडो पुस्तके वाचतो आपण, पण स्वतःला वाचू शकत नाही आपण. ते शिकवलं मला, so called वादानी. Separation नि. Patience वाढलाय. स्वताच कौतुक नाही, पण stable झालोय, शांत झालोय. चिडत नाहीये मी आता लवकर, पूर्वीसारखा. थोडाश्या प्रमाणात मी स्वतःला त्रयस्थ नजरेतून पाहू शकतोय.U know.”

काय त्रास न. एक गोष्ट माझ्या मनात आहे. पण ते करायची हिम्मत होत नाही, करत नाही. कारणे  complex असतात का आपण ती complex करून घेतो. उगाच. पण नक्की मनात अश्या गोष्टी असतात, फक्त त्याची जाणीव व्हायची गरज असते.त्या स्वतःला कबूल व्हाव्या लागतात.  At least मनालातरी शांती मिळते.

“hmm true. पण thnx कोणाला जाऊन म्हणणार?”

ह्याच प्रश्नाचं अजून उत्तर मिळत नाहीये. म्हणूनच हे सगळे अजूनही माझ्याच मनात आहे.

UNPOST!

Thursday, January 27, 2011

माणसे --- व.पु.काळे

बर्फ नऊ दशांश पाण्याखाली असतो
एकदशांश पाण्याच्यावर असतो.
असं काहीसे गणिताप्रमाणे म्हणतात.
हे प्रमाण मी चुकीचंही मांडले असेल,
गणिताचा प्रांत बुद्धीचा.
म्हणूनच माझ्या नकाशात ती जागा कोरी.
मी तेव्हढ्या जागेचा extra FSI हृदयाला दिला.
गणितापेक्षा कविता मोठी मानली.
म्हणूच अनेक माणसे भेटली.
ती सगळी चैतन्याची विविध रूपे होती, म्हणून
मी त्या दीर्घकाव्याची कडवी मोजत राहिलो नाही,
मोजमाप म्हणजे पुन्हा गणितच.
कविता मोजायची नसते...
तिथे  हरवायचे  असते.

 Written by व. पु. काळे, just shared to you all

Friday, January 21, 2011

Sorry!



परवा पु.ल.देशपांडे उद्यानात गेलो होतो. दादोजींचा पुतळा तिथे ठेवलाय हे माहित होते. actually तो पुतळा बघायला गेलो नव्हतो. मी as a routine गेलो होतो. डाव्या हाताला दादोजींचा पुतळा दिसला, आणि पुतळ्याच्या डाव्या हाताला एक रक्षक. (काय  sarcasm आहे नं? दादोजींच्या पुतळयाला रक्षक.) काय विचार आले मनात?, पण त्या पुतळ्याकडे बघत थोडसं अलीकडे कठड्यावर बसलो. मी त्या पुतळ्याकडे बघत होतो आणि तो रक्षक माझ्याकडे.
exactly कसला विचार करत होतो ते सांगता येणार नाही, पण एकंदरीत पुतळ्याचे रूप न्याहाळत होतो. छानच आहे पुतळा. हे पुतळे एकाच रंगात का करतात माहित नाही. तरीसुद्धा भारदस्त होता. खरे खुरे दादोजी समोर उभे राहिले असते तर तो पुतळा हलवायची कोणाची हिम्मत झाली नसती आणि मग त्यावरून दंगा पण झाला नसता.  
मग आता पुढे काय? साहजिकच दादोजिंबाबत विचार करायला लागलो, त्यांच्या विषयीच्या सर्व चर्चा, सर्व लेख आठवले ...पण दादोजींनी शिवाजीराजांना शिकवले ह्या पलीकडे मला काहीच माहित नाही. माझे इतिहासाचे ज्ञान तोकडे आहे, का आम्हाला एव्हढेच शिकवले? पण खरंच ह्या पेक्षा जास्त माहीत असण्याची गरज होती का? मला तर खरंच वाटत नाही. त्यातून वाद काय आहे हे तर जाणून घ्यायची  अजिबात नाही. basically matter काय आहे इथपर्यंत, ठीक आहे पण त्यावर काहीच बोलायचं नाहीये .. काय वाटत असेल दादोजींना? शंभर टक्के हाणला असता सगळ्यांना ..
how  must he be feeling? bull shit.
"खरंय यार ! जाम फालतू आहेत हे लोक." मी मान वळवली तर दादोजी माझ्याशी बोलत होते.
दादोजी म्हणल्यावर " मुघल सत्तेने चालवलेले कारस्थान थांबवलेच पाहिजे. मायबापाची काळजी घेतलीच पाहिजे .." असले  काहीतरी  तडफदार  वाक्य पाहिजे  होते, पण  हे  काहीतरी  वेगळेच  होते .
"काय ?" मी .
हलकीशी स्मितरेषा चेहऱ्यावर पाहून मी तर hang च झालो.
"तुम्ही हसताय ?"
"अरेय पु लंच्या राज्यात येऊन न हसायला मला काय वेड लागले आहे?"
"काय?"
"तू पुणेकर, नागपूरकर कि मुंबईकर? पु  लंच्या joke  वर हसत नाही का तुम्ही?" दादोजी  काय बोलत होते, मी साफ हरलो होतो.
"दादोजी तुम्हाला नेहमीच गुरुस्थानी पहिले होते. पण तुमचे हे रूप नवीन आहे. आणि तुम्हाला पु ल काय माहित?"
"खरे सांगू का? इथे मोकळ्या हवेत खरच बरं वाटते. लाल महालात अख्खे आयुष्य काढले. नजीकच्या काळात तर जीव गुदमरायचा. नको व्हायचं अगदी, काही बाही ऐकून. इतिहास हा शिकण्यासाठी असतो रे. चांगल्या गोष्टीतून बोध घ्यायचा, चुका सुधारायच्या. त्यातून अन्वयार्थ काढून, जुन्या गोष्टी उकरून त्यावरून आज भांडण्यात काय अर्थ आहे. अजून तुम्हाला कळत कसे नाही, हे फिरंगी आग लावतात तुमच्यात आणि तुम्ही आपापसात भांडत बसता. आणि पु लं विषयी इथे येऊनच कळले. एकदा आले होते लाल महालात, पण उडती भेट होती अगदीच."
"ठीक आहे, पण हा शॉक आहे माझ्यासाठी. मी लोकांना सांगितले की दादोजी माझ्याशी असे बोलत होते तर वेड्यात काढतील मला."  
"लोकांचा काय घेऊन बसलास? शहाण्या माणसाला वेडा ठरवण्यात हातखंडा आहे त्यांचा."
मला काय बोलावे काहीच सुचत नव्हते. थोडी हिम्मत करून म्हणालो " तुम्हाला फारच विचित्र वाटत असेल हे सगळे ऐकून, rather भोगून. खरच i am sorry for that ."
"sorry कसले अरेय! खरं सांगू का? जे काही चालू आहे ते खरंच कळण्याच्या पलीकडे आहे. आम्ही त्या काळी काय परीस्थितीत जगलो?, हे मराठी राज्य केलं? ह्यांना काय माहित? जे केलं त्यातून प्रेरणा घ्यायचं सोडून वेगळंच काहीतरी. ह्या फिरंग्यांना जो काही अन्वयार्थ काढायचा आहे तो काढू देत, पण आपण मराठी लोकांना एव्हढं कळायला पाहिजे न काय काय घ्यायचं आणि कशाला विरोध करायचा? त्या फिरंग्यांनी केले संशोधन , ठीक आहे. तू तुझ्या घरी चांगला. हे लोक आमचे आदर्श आहेत आणि आम्ही तुमच्या विचारला थारा देत नाही, हे एव्हढा सांगायची हिम्मत नसेल तर कसले सरकार तुमचे?  सद्सद्विवेक बुद्धी कुठे गेली? आणि मग सत्तेच्या विरोधात गेले तर काय चूक आहे दंगा करणाऱ्यांची? त्यांनी विरोध दर्शवण्याचा मार्ग बदलावा, पण शाळेच्या पुस्तकातून आम्हाला काढून इतिहास पुसण्याचा विचार असेल सरकारचा तर हा आमचा अपमान आहे. हा शिवाजी राजांचा अपमान आहे. हा आई भवानी चा अपमान आहे. "  
i  swear जाम frustrating वाटत असेल.
"काय बोलणार मी ह्यावर. सगळं कळतंय मला पण माझ्या हातात काहीच नाहीये. शरमेनी मान खाली घालण्या शिवाय मी काहीच करू शकत नाही. तुमच्या आणि शिवबाच्या गोष्टी आम्ही मुलांना सांगतो, आणि ह्याच मुलांनी तुम्हाला बागेत असे उघड्यावर पहिले काय विचारतील आम्हाला ? विचारच करवत नाही. damn sorry sir .."
"अरेय! sorry परत? पुढची मजा मी सांगतो. २ वर्षांनी परत निवडणुका आहेत. त्या वेळी सत्ता बदलली की  आमची परत रवानगी होणार कुठेतरी.मग परत दंगा. काही सांगता येत नाही. येरवड्याच्या जेल मध्ये पण ठेवायला कमी करणार नाही हे लोक. मग आपली भेट होणे अवघड आहे. तुला जर काही करणे शक्य असेल तर एक कर, इथून मला परत लाल महालात नको, सिंहगडावर न्या. त्या मर्द मावळ्या तानाजी बरोबर बसेन. जुन्या आठवणीत मन रमेल. तुमच्या पासून दूर. नकोच इथे. आणि हो, तिथे आपली भेट होईल नक्कीच." 
मला खरच वेड लागले होते. मोठ्या आवाजात बोलून गेलो. sorry सर.
खरंच sorry .

Sunday, January 16, 2011

Invisible

शनिवारी संध्याकाळी साधारण ७.३० ची वेळ असेल, काही काम नव्हतं.एकटाच होतो. सुन्या मुंबईला गेला होता. "मैत्रीण"  ला भेटायला. आणि पिल्लू आणि माझं भांडण झालं होतं. Gmail वर sign in केलं. inbox मधल्या unread mail check करेस्तोवर. 'ती' online आली. मी invisible होतो. काय करावे? अश्या स्थितीत सुन्याचा mail न वाचताच परत inbox ला गेलो. सगळ्या आठवणी आणि विसरणी डोळ्या समोरून झर्रकन सरल्या.
सरळ visible व्हावं, तर ती hi तरी करेल का? समजा तिनी नाही केलं, आणि मी केलं तर reply तरी देईल का? मी का ping करायचं? असे काहीसे egoistic प्रश्न जमून आले आणि जोराचा पाऊस सुरु झाला. आतल्या आत.  ओह्ह. त्या पेक्षा सरळ sign out होऊयात. कटकट नको डोक्याला. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी.

काम तर काहीच नव्हत. उगाच  कुठले तरी फोटो काढले आणि बघत बसलो. कुठले ते आठवत नाही. मधूनच ALT +TAB नि gmail वर जात होतो. अजूनही 'ती' होती. बास. go to hell. visible झालो.
no hi no hello. फुल जळजळ.
"च्यायला. उगाच झालो visible. स्वत स्वताची मारून घेतली. "
"तरी सांगत होतो sign out हो. त्यातच भलाई आहे. पण नाही. "
हिरवा light orange झाला.
"हाहा ती जागेवरच नाहीये. असती तर केलं असतं पिंग"
"ठीके पण तू आता का त्याच्या पिंग ची वाट बघतोय?"
"का म्हणजे काय? we know each other "
" we are frnds म्हणायला आज  जीभ धजावत नाहीये"
"आम्ही आहोतच, सध्या जरा थोडीशी game झालीये इतकाच. she might be busy somewhere else "
"काय किस्सा काय झालाय?"
"जसा काही तुला माहीतच नाहीये."
" हाहा. झगडे तो पहले भी होते थे, पर एक missed call पे सरी कडवाहट मुस्कुराहट में बदल जाती थी.ह्या type दिसतंय काहीतरी. बोल बोल "
"हो पण परवाच भांडण जरा लागलं.मी लई विचार करत होतो, पण आता झालय अस कि मी काय बोललो तेच आठवत नाहीये आणि नुसतीच तिची आठवण येत आहे. "
"मग आता विचार काय आहे? काय करायचं ठरवल आहेस?"
"तेच करून करून वेडा झालोय. पण काहीच ठरत नाहीये. बघ ना आता, आम्ही दोघे एकमेकांना ४ वर्ष तरी ओळखत आहोत. you know all stuff, how we met n all that. Then we started feeling something for each other. you said मी प्रेमात पडलोय. मग पुढे काही करायची गरजच नाही पडली. तशी ती समजूतदार आहे पण परवा काय झाला होते काय माहीत ?"
"हम्म"
" हम्म काय साल्या सांग ना काहीतरी."
" नाही नाही तू मोकळा हो आधी, मग मी आहेच."
'साला. i was thinking like, हि आत्ताच एव्हढी का मनाला लावून घेतीये? मी काहीतरी  major काशी घातलीये आणि मला त्याचा पत्ताच नाहीये. Then i started feeling like, she might be feeling something unsecured. means she knows i care for her, am always there to help her.शेवटी  नात्यातली security पण महत्वाची असेल. आम्ही बराच वेळ एकत्र घालवतो. we share lots of things. But there is a thin line of threshold. I feel i need to be more responsible relationship wise. सर्व चांगल्या गोष्टी जरी असल्या तरी जबाबदारीची जाणीव  झाली कि एक विश्वास निर्माण होतो. long term relations."
"Sounds good. hmm.actually  pretty responsible"
"खेच तू साल्या"
"k , मग आता plan काय आहे?"
"तेच तर कळत नाहीये. "
"i feel सरळ propose का नाही करत तिला?"
"आत्ता?परत? काय angle काय आहे?"
"हे बघ तुला जबादारीची जाणीव झालीये, is a good thing . But she must know that this change has taken a place ."
"म्हणजे तुला वाटत m thinking on a right track ?"
"certainly dude ."

"बाप. इतका सरळ तू कधीच बोलला नव्हतास. मग काय करू? i mean कसं करू? direct लग्नाची मागणी घालू का?"
"अजून काही उरलाय का?"
"best way चहा पोहे बनव आणि invite her . proper arrange marriage चा दाखवण्याचा कार्यक्रम होऊन जावू दे"

"काहीही."
"बर आतासाठी तर चहा बनव. काळजी नको करू. मी नाही तुला होकार देणार."
"shhhhhheeee max disgusting . बाजार उठलाय तुझा. बस मी चहा टाकतो."

"hi.... kasa ahes?"
" हाहाहा . तिनी केलं पिंग. हो बाजू."
"
man this is my turn right now . तू चहा टाक मी करतो chat तिच्याशी. तुला नाही जमत ते."

and they live ....ever-after..

छत्री

संध्याकाळी चार पाचचा सुमार असेल. कंपनीतून लवकर निघालो होतो. spicer college  रोडवर एक bus stop आहे. bus stop च्या पुढे साधारण शे पाऊणशे फुटांवर गाडी लावली. जीवनावश्यक वस्तू (पाणी आणि camera ) घेतल्या, एक छत्रीपण घेतली आणि stop वर येऊन बसलो.  नक्की सांगता  नाही angle काय होता, पण मी busstop वर बसलो. बर्यापैके शेड होती. बाकडी पण होती. मागच्या बाजूला डेरेदार वृक्ष होता. त्यामुळे एकंदरीत long shot छान आला असता ..

रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती, तसाच bus stop पण शांत होता. उजव्या बाजूनी एक आजोबा काठी टेकतात तशी छत्री टेकत टेकत येत होते. stop पाशी आल्यावर छत्री शेजारी ठेवली, माझ्या कडे बघून हसले  आणि बसले. माझा पूर्ण लक्ष त्यांच्या छत्री कडे होते. लांब सडक छत्री, वळणदार मूठ, पुढे एक टोक, एकाच घडीची, बहुतेक 'हिरण' ब्रांड असेल. पण काही बारीक भोकं पडली होती. as against  माझी छत्री छोटीशी होती, सरळ पकड, दोन तीन फोल्ड वाली असेल, पण भोकं पडली आहेत का हे माहित व्हायला अजून उदघाटन केलं नव्हत.

 generation चा फरक न्याहाळत असतना हलकेच हसू आले आणि मला लहानपण आठवले.  अगदी लहान असताना "अरेय चिकू च्या डोळ्यात जाईल, छत्री लांब ठेवा" हे शब्द. ऐकल्याचा आठवत नाही पण असेच काहीसे असणार. आठवण तळघरात पोचते ते दुसरी तिसरी पर्यंत. तेंव्हा मी आणि सुन्या छत्री  छत्री खेळायचो. काय नाव आहे ना? छत्री छत्री. (असल्या खेळांची नाव दोनदा का घेतात ते माहित नाही, like घर घर, शाळा शाळा असले खेळ असायचे).  नंतर शाळेत जाताना छत्रीचा खरा वापर सुरु झाला. तेंव्हा शाळेत बस नि जायचो. ते अगदी college मध्ये असताना ' प्यार हुआ  इकरार हुआ ' style पर्यंत.

मीच आश्चर्यचकित होऊन स्वताशीच हसायला लागलो. हलकेच smile आले. तेव्हढ्यात एक छोट्या, bugs bunny ची छत्री घेऊन त्याच्या आईबरोबर बस stop वर आला आणि मला आठवणींच्या राज्यात परत घेऊन गेला. आम्ही तर फक्त काळ्याच छत्र्या वापरल्या. पावसाळ्यात उगवणाऱ्या कुत्र्यांच्या छत्र्या ह्या पांढर्या. काय ना? कुत्र्याची छत्री. तेंव्हा भिजत भिजत ह्या गमती पाहायला बाहेर पडायचो. आणि नंतर college च्या काळात छत्री घेऊन बाहेर पडायचो आणि गमती करायचो. माझ्या कडे उलट्या छत्रीचा पण एक फोटो आहे. खरच भारी.

'ठौंयिक छिक' अप्पा भिंगार्देन्च्या style मध्ये कोणीतरी शिंकला. ओह्ह. पाऊस सुरु झाला होता आणि झाडाच्या आडोश्याला दुचाकी वाले येऊन थांबत होते. Dio वर दोन मुलीपण येऊन थांबल्या आणि माझी डावी भुवई कधी वर गेली मलाच कळलं नाही. आता लोकांची गर्दी होणार. मनात म्हटलं आता निघावे. छतावरून टपकणारे थेंब, बनीची छत्री, dio वरच्या मुली..असे मोहक क्षण सोडून मी फक्त आजोबांच्या छत्रीचा फोटो काढला. bunty bubbli style मान मोडत उठलो. कसं काय माहित नाही पण चुकून आजोबांना म्हणून गेलो " चला आजोबा आपण निघूया"   ****! बाप रे!  मला जाम विचित्र वाटलं.

आजोबा मात्र बिनधास्त बोलून गेले "छत्री चा वापर आता फक्त काठी सारखाच  होतो. मी पाऊस थांबल्यावरच  निघेन."

रात्रीचा पाऊस

रात्री 2 वाजताचा पाऊस.
ना चमचमत्या विजांचा 
ना गडगडत्या ढगांचा ..
पाउसाचा पाऊस.
शांत पाऊस 
अविश्रांत पाऊस.

खिडकी उघडून कट्ट्यावर दोन्ही हातांची घडी घालून बसलो.
मान हातांवर ठेवली आणि पाऊस बघत बसलो.

रात्री 2.15 चा पाऊस.
संथ वारा वाहतो.
झाडांचा  hissing sound
कानामागे तिचे भास 
अंगणातल्या तळ्यात आणि street light च्या उजेडात 
दिसणारं तिचं प्रतिबिंब.
प्रत्येक  थेंबापरी तिची वेगळी आठवण.
ह्या आठवणी जागवणारा 
मला वेगळ्या जगात नेणारा 
मनातला पाऊस.
सरसकट  पाऊस .

पण पाउसाच्या मनात काहीतरी वेगळं होतं. रोमांचित विचारात अडकलेल्या माझ्या चेहऱ्या वर पाणी मारलं. आणि मला जाग केलं.

रात्री 2.30 चा पाऊस.
हळुवार पाऊस 
काहीतरी सांगणारा पाऊस.
एक एक शब्द
तोलून मापून .
प्रगल्भ पाऊस.(matured paus)
तरीपण माझ्यातालाच एक वाटणारा.
मित्र पाऊस.

टिपिक टिपिक थेम्बातून 
जाणीवपूर्वक 
अर्थ लावत होतो मी 
प्रत्येक थेंबाचा ..

शांत पाऊस .
मनातला पाऊस .
रात्रीचा पाऊस .

Ambrosia

खाली आलो तर पिल्लू घरात येऊन बसली होती. दारात चपला दिसल्या आणि आतून  TV चा आवाज येत होता. आमचा  पाऊलआवाज आल्यावर  TV बंद  झाला आणि पिल्लू बाहेरच्या खोलीत आली. मी माझा cup आत ठेवला आणि कैमरा हातातच अश्या नेहमीच्या style मध्ये बाहेर आलो. general गप्पा सुरु  झाल्या . पिल्लू  college मधल्या काही गोष्टी सांगत होती. सुन्या galleryt उभा राहून  “मैत्रीण”  (त्याची मैत्रीण मुंबईला असते, माझं आणि तीच फारसं पटत नाही) शी बोलत होता. आमचं बोलणं ऐकू यईल  एव्हढ्या अंतरावर.

“आज  ambrosia ला जावू” .मी 
सुन्या  “मी  नाही ” अश्या खुणा करू लागला. “ठीक आहे ” पिल्लू . मी  landline वरून सरळ सुन्याच्या घरी  phone लावला आणि तो जेवायला येणार नसल्याचं कळवलं. ‘मैत्रीण’शी बोलत असल्यामुळे त्याला काहीच करता आले नाही.
“आज पोर्णिमा आहे. मस्त poolside बसू ” मी.
“वेळेत निघू आणि वेळेत येऊ ..एए सुन्या अवर रे. दे इकडे मी बोलते ” पिल्लूनि त्याच्याकडून phone हिसकावून घेतला. मग त्या दोघी सुरु झाल्या. पिल्लू आणि मैत्रीण छान जोडी जमते. full gossip आणि खरेदी एकत्र. मी आणि सुन्या दोघही सुखी . दोघी phone वर बोलत असताना आम्ही बर्यापैकी आवरून बाहेर आलो. car काढली. तरी phone चालूच  होता. चांदणी चौकात  पोहोचल्यावर phone परत सुन्याकडे गेला ते अगदी जेवण येईस्तोवर.

पोर्णिमा …. Ambrosia, poolsaide…., हलका उजेड आणि समोर photogenic face…. Photo काढायचं टाळणं अश्यावेळी खूप  अवघड असते. पण काय करणार पिल्लूला आवडत नाही असं फोटो काढण. Obvisuosly आधीचे तिचे असे photo मात्र तिला  खूप आवडले आहेत. Frames मनात साठवून ठेवत होतो. जेवण झालं bill दिले आणि बाहेर आलो. भूगाव पर्यंत खाली आलो. परत येताना रसत्यावर कोणी नाही बघून head lamp बंद केले. आआआआआछ्ह  11111. पहिले किंचाळलेली पिल्लूनंतर आपोआप शांत झाली. स्वच्छ चंद्र प्रकाश. शांत रस्ता. पोहनकरांचे  ‘का करू सजनी’. आणि मागच्या seat वर सुन्या. Just missed. (बहुतेक हे पण ते अडीचावे घर असेल ) पिरंगुटचा घाट आला तसे  light परत लावले. परत चांदणी चौकात आलो तोपर्यंत 10 वाजले असावेत . 

Naturals ला  ice-cream खायला आल  .. Ice cream घेऊन बाहेर येऊन बसलो. General गप्पा चालल्या होत्या. मी मगासच्या drive मूड मधून बाहेर आलो नव्हतो. May be यायचा हि नसेल, त्यामुळे मी शांत होतो. उर्वरित दोघे काहीतरी उर्वरित बडबड करत होते. सुन्या आजची हार साफ विसरला होता पण मला आज हार खुणावत  होती. (मला आज हरायचे होते) का कोण जाणे moonlight drive वर मी हरलो नव्हतो. का कोण जाणे एक फोटो अजून बाकी होता. अडीचावे घर बाकी होते. काहीतरी अडकल होतं.

तेवढ्यात एक छोटी मुलगी समोर आली. ना ती फुगे विकत होती ना ती काही मागत होती (भीक हे शब्द मी मुद्दाम टाळले कारण तिनी तसे करू नये हि इच्छा ). मी शक्यतो अश्यांपासून दूर राहतो. त्यांना काही देणं मला  पटतही नाही पण मग काय करायच? ह्या प्रश्नाचे उत्तरहि माझ्याकडे नसते. पिल्लुनी तिला  ice-creame हवं का विचारले. तर नको म्हणाली. मानेनीच. Her stare was killing me. मी साफ हरलो होतो. मी तिची नजर टाळू इच्छित असलो तरी मला शक्य होत नव्हते. डाव्या डोळ्याखालच्या पाण्याचा रेघेत मला बघायचे नव्हते. अश्यावेळी मनात उभे राहणारे सर्व प्रश्न टाळायचे होते. कोण हि? कुठे राहते? असं कश्यामुळे करत असेल? आई वडील? Slumdog ची चित्र समोर येऊन गेली. पण हे सर्व प्रश्न मी टाळू शकलो.

तिच्या डोळ्यातच तेव्हढी ताकद होती. साफ हरलो होतो मी. माहित नाही काय झालं होत मला. काय भावना होत्या माझ्या मनात. जाणून घायची इच्छहि नव्हती. काहीच जाणून न घेण्याची इच्छा. खरतर असं फार कमी  वेळा होत. पण आज तस झालं होत आणि मला ते जगायचं होत. कोणताही भिकारी समोर आला  कि स्वतापासून पळून जाणारा मी, ह्या सर्व प्रश्नानपासून अलिप्त राहायचा प्रयत्न करणारा मी आज वेगळाच वागत होतो. का कसं कधी कोणासाठी असल सर्व प्रश्न टाळून मी पाण्याची बाटली तिला दिली. तिनी पण ती शांतपणे  घेतली. मलाच कळलं नाही मी camera केंव्हा उघडला आणि  photo काढला. पण ती  continue माझ्याकडे पाहत  होती. अगदी थेट  lens मधून माझ्या डोळ्यातून आत, माझ्यात. पाणी पितानासुद्धा. बाटली परत देऊन,  मागे वळून न बघता ती शांतपणे रस्ता cross करून निघून गेली.
100 अनुत्तरीत  प्रश्न .

पिल्लू डोळे मोट्ठे करून, अवाक होऊन माझ्याकडे पाहत होती. ह्याला आज काय झाले? सुन्या  photo पाहून वेडा झाला होता. आणि naturals चा security वाला.....

आजही तो photo बघताना अंगावर शहारा येतो. मी त्याचवेळी असं अनपेक्षित का वागलो .आणि अनपेक्षित मलाच.बाप रे.  बरोबर तिला पाणीच हवं आहे हे मला कसं कळलं . .का माझीच अर्धवट राहिलेली तहान तिनी भागवली होती. स्वच्छ चंद्र प्रकशात न्हाहून न भागलेली तहान. photojenic face समोर असताना photo राहिल्याची तहान... कसली  धीट होती ती. असे  photo कधीच जमणार  नाहीत असं वाटणारा मी नकळत असा फोटो काढून गेलो कि  जो मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. Zoom in करून पाहिला कि डोळे  …त्यात राग नव्हता, innocence नव्हता, काही मागण नव्हतं, काही सांगण नव्हतं. फक्त  माझ्याकडे बघणं होते (आणि एक catchlight ). आजही photoतून तेच भाव  समोर येतात. मी तो  photo अजून कोणाशीच hare नाही  केला. May be हि  पण एक विसरण असेल.माझ्यात हिम्मत नाही कि माझ्या ती लक्षात आहे हे मी सर्वांना ओरडून सांगेन.  मी उत्तर शोधायच्या भानगडीत पडलोच नाही. मला ती मिळणारच  नव्हती .

घोडा



घोड्यासमोरच प्याद पुढे घेऊन मी डाव open केला. समोर सुन्या होता त्यामुळे आधीच tension आलं होतं. त्याने वाजीरासमोरच प्याद हलवलं आणि 'G4E5' असं काहीतरी बोलला. "थांब रे! माझा वजीर येऊ दे तुझ्या हद्दीत. मग बघ कसा बाजीप्रभू लढतोय माझा." सुन्याचा बुद्धीबाळातला अनुभव आणि माझा निरुत्साह, त्याचं technical knowledge आणि माझी भीती, त्याच aggression आणि माझ अज्ञान. एकंदरीत मी हरणार हे निश्चित होतं, तरीसुद्धा मी खेळ सुरु केला.

सुनील उर्फ सुन्या माझा दोस्त, "chess आपली जान आहे"  . आणि मी. anti chess जास्त खेळलेलो. तरीपण सुन्या दर गुरवारी येतो आम्ही त्याच्या भाषेत च्येस खेळतो आणि मी हरतो. 
साधारणपणे मध्यावर डाव आला असेल. माझ जास्त काही लक्ष नव्हते. माझी  ३ प्यादी दोन्ही उंट आणि १ हत्ती मेला होता. सुन्याचे दोन्ही घोडे १ उंट आणि १ हत्ती  गेले होते. अजून थोडा वेळ त्याच्या वजीराचा हैदोस चालू होता. मला तर काहीच कळत नव्हत. थोड्या वेळानी सुन्याच म्हणाला "साला तुझे दोन्ही घोडे जीते ठेवले आणि माती खाल्ली." 

आज सुन्या हरला होता. त्यापेक्षा मी सुन्याला हरवल होत. हा हः हा करत मोठ्याने हसत मी उठलो. खरतर मी जिंकलोय हे मलाच कळलं नव्हतं, पण माझे दोन्ही घोडे उपयोगात आले होते आणि त्याच्या राजाला  मी शह दिला  होता. 

सुन्यानी माझ्याशी  अबोला धरला. चहा घेणार का? असं विचारलं तरी उत्तर नाही मिळालं. संध्याकाळ होत आली होती, मी चहा टाकला. दोन cup भरले. त्याचा table वर वाजवून ठेवला, camera घेतला आणि गच्चीत जायला निघालो. खरच किती दिवसांनी गच्चीत आलो होतो. आःहा. कट्ट्या वर cup ठेवला, बाहेरच्या बाजूला पाय सोडले आणि camera हातात घेऊन बसलो. मस्त. एक. सूर्य मावळायला आला होता पण ढगाआड लपला  होता. मान फिरवून बघितलं..चंद्र पण आला नव्हता.  cup ओठाला लावला, दोन घोट प्यायलो cup खाली ठेवला. camera उघडला. पश्चिमे कडून वटवाघालांचा प्रवास सुरु झाला  होता. समोरची building ९व्या मजल्या पर्यंत आली होती. साधारणपणे ३/४ मिनिटात सूर्यास्त होणार होता. पाहिला फोटो काढला, दुसरा फोटो काढला आणि तिसरा फोटो शोधू लागलो.
तेवढ्यात सूर्य ढगातून  बाहेर  आला. cup ठेवायला मागे वळलो तर चंद्र पण उगवला. बाप. सूर्यास्त आणि चंद्रोदय. ११११११११११११११. पण फोटो कोणाचा काढू? चंद्र का सूर्य? पुढा का मागे? माझा घोडा झाला  होता. एक झालं दोन झालं आणि मग अडीच पुढे का मागे अश्या प्रश्नात  मी अडकलो. पण फोटोच्या बाबतीत  मी risk घेऊ शकत नाही. कचकच सगळे फोटो काढले. सूर्य दिसेनासा झाला होता. चंद्राकडे पाठ होती. 

अश्या वेळेस मी विचारात पडतो. सहज हसू आले. "साला तुझे दोन्ही घोडे जीते ठेवले आणि माती खाल्ली." माझा घोडा होणं. हसू वाढू लागले. एक भुवई वर गेली. मग उंटासारखी तिरकी चालणारी माणस दिसू लागली. मग हत्तीसारखी सरळ जाणारी. वजीरासारही स्वच्छंदी. पण घोडा. एक दोन अडीच? घोड्यासारख्याची चाल का अडवली? ती पण दोन नाही किंवा तीन. अडीच वर? बाप रे. त्रास व्हायला लागला. पण साला त्यालाच निर्णय क्षमता पण आहे. अड़ीचाव घर डावीकडे का उजवीकडे हे ठरवायची. ८ घरांचा  option आहे त्याला. आपल्याच भिडूच्या डोक्यावरून उडी मारून जातो साला. सर्व अडथळे पार करून गानिमे काव्यांनी हल्ले करणारा घोडा. मला  विचार करायला लावत होता.



कोण चालत घोड्यासारख? मगाशी माझा का घोडा  झाला होता? मी घोड्याचा वापर करूनच जिंकलो होतो. त्रास. मी चालतो का घोड्या सारखा?  एक दोन अडीच. शाळेतून trek सुरु झाले, नंतर group छोटा झाला, आणि आता तर एकटा सिंहगडावर  जातो. हीच अडीचावी चाल का? हेच ते अड़ीचावे घर का? camera घेतला, photo सुरु झाले आणि reflections ला फोटो लागला,  हेच अड़ीचावे घर का? का मगाशी सूर्य का चंद्र हा पडलेला प्रश्न? बाप रे.

हे अडीचावे घर मला खुणावतंय . दोन चाली खेळल्यावर अडीच साठीचा मिळणारा  option मला हवाहवासा  वाटतोय. आपल्याच भिडूच्या डोक्यावरून  जाणार घोडा मला कर्तव्यामुळे  येणारे अडथळे पार करायला शिकवतोय. सरळ हल्ला करताना उंट वजीर डोळ्यात भरतात. पण down to earth  राहूनच मला check द्यायचाय. पडद्याआड राहून सवंगडयाना साथ द्यायची आहे. "कधीही हाक मारा, हे पोरग कुठूनही येणारच" हा विश्वास निर्माण करायचाय. माहित नाही हे बरोबर आहे का? मला जमेल का? सगळ्यांना पटेल का? पण ते अडीचावे घर खुणावतंय. ध्रुवाच अढळ पद  नाही मिळाले तरी चालेल पण अडीच. पाहिजे.

साफ अंधार झाला होता. चंद्र डोक्यावर येऊ लागला  होता. इतक्यात सुन्या आला. "चले चल. लई मोठा आला  मला हरवणारा. पिल्लू आलीये खाली  तुझी.  आवरा आता."

मी हसत हसत उठलो. सुन्यापण नॉर्मलला आला होता. मला पण बरीच उत्तर मिळाली होती. जिन्यातून उतरताना मी एक दोन आणि धाप कान अडीच असं करत उतरू लागलो.
माझ्या घोड्यांनी मला शह  दिला होता. पार checkmate

उन पाउस



मावळतीला  मेघ  पेटले 
रवी  तरीही  निश्चल ,
चिता  सोबत्यांच्या  लागल्या 
अश्रू  तरीही  अचल .

धरणी  येता  काकुळतीला 
सागर  मागे  क्षमायाचना ,
तसू भरही  न  ढळे  आदित्याची 
अतिदिव्य  अग्निसाधना .

रूप  बदलूनी  गुलमोहर  बहावा 
उभा  करी  सुंदर  देखावा ,
उमदे  देखणे  रूप  परी 
हरित पर्णाशी  कसला  दुरावा .

मृग नक्षत्राचा फुलता  पिसारा 
सुखावे  अवघी  सृष्टी  ,
सांध्यक्षणी  तो  सोसाट वारा   
अधू  करीतसे  माझी  दृष्टी .

आकाश सोबती दाटून  येती 
लपून  जाई  अखंड  निळाई ,
क्षणात  समजे  खेळ  सारा 
जशी  काही  वीज  चमकावी .

पोचता  जलधारा  जमिनीवरी 
मीलन  होई  आसमंताशी  ,
सागरा  येईये  आनंद उधाण   
हलकेच  तरीही  पाझरे  पाषाण .

सांज सकाळी कधी अवेळी
हिरमुसलेल्या एकांतवेळी ,
मीच  माझ्याशी 
उन पाऊसाचा  खेळ खेळी.

निसरडा

पहिला  पाऊस  आला  की   वाट  एकदम  निसरडी  होऊन  जाते . किंवा  आपल्या  अपेक्षेपेक्षा  वाटेवरची  आपली  पकड  ढिली  होते ..

अश्याच  निसरड्या  क्षणी 
मी  घरातून  बाहेर  पडतो. 
हळूच. 
एकटाच. 
हलक्या  सरी 
ढग  आणि  वाऱ्याचा  खेळ 
बघत  अनुभवत 
शहराच्या  बाहेर   येतो .
तसा  पाऊस  वाढतो.. 

भिजायचं  का  नाही?
हे  ठरवता  येत  नाही 
म्हणून  मी  थांबतो.  
चहा  सांगतो.
चहाचा  गरम  cup किंवा 
गरम  चहाचा cup
हातात  पकडून  उभा  राहतो.
पत्र्यावरून  पडणारा  पावसाचा  एकेक  थेंब पाहत.
चहा  गार  झाल्याची  जाणीव  होते 
आणि  एकदम  चहा  संपवतो. 
“जाणिवाच   बोथट  झाल्यात 
त्यात  चहाचा  काय  दोष ?”
स्वतालाच  सांगतो.
पैसे  देऊन  निघतो. 
‘ती ’ची  आठवण प्रकर्षानी  टाळतो. 
प्रकर्ष , उत्कर्ष , हर्ष  असल्या  जाणीवही  टाळतो . .
माझ्यातल्या  एका  मलाच 
मागे  टपरीपाशी  ठेवून 
मी  पुढे  निघतो ....

नेहमी  प्रमाणे  bike   वर  उजव्या  बाजूने  बसतो.
वातावरणात  एक  नाविन्य  भरलेले  असते 
म्हणूनच  जुन्या  आठवणीत  जायचे  नसते 
मागच्याच  आठवड्यात  उघडे  बोडके  डोंगर 
पूर्णपणे  हिरवाईत  नटलेले 
माझाच  माझ्या  डोळ्यांवर  विश्वास  बसत  नाही. 
विश्वास  अविश्वास  श्वास  भास 
असल्या  खेळात  एका  मला 
मागे  ठेऊन   पुढे  निघतो ....

शाळेच  नवीन  वर्ष  सुरु  झालेले  असतं. 
मुलाप्रमाणे  पक्षी  सुद्धा  नवीन  पानांचा 
वास  घेण्यात  गर्क  असतात.
शाळा  भरायच्या  आधीची  पोरांची  किलबिल 
पक्ष्यांच्या  गोंधळाला  पार  फिके  पडत  असते. 
हे  सगळे  एकट्यानीच  बघताना 
एक  छोटासा  हसू  कधी  येत   मला  कळत  नाही. 
असं  वाटत  मनसोक्त  photo काढावेत 
पण  हे  क्षण  जगायचे  असतात 
Camerat बंद  करायचे  नसतात . 
माझ्यातल्या  अजून  एका  मला 
कसलाही  विचार  करायला  न  लावता 
फक्त  खेळ  बघत  उभा  करून 
ते  हसू  चेहऱ्यावर तसंच  ठेऊन 
मी  पुढे  निघतो. 

आपल्या  अपेक्षेपेक्षा  वाटेवरचा   आपला  ताबा  गेला   कि  आपण  त्याला  निसरडी   वाट  म्हणतो 
माझ्या  अपेक्षेपेक्षा  माझा  माझ्यावरच  ताबा  जातो  आहे . स्पष्ट  पणे  जाणवत  आहे 
तरी  सुद्धा  काहीच  जाणवत  नाही  असं  मी  दाखवत  असतो .

ह्या  अपेक्षाच  सगळ्या  घोळ  करतात.

मागे  सोडलेल्या  तिघांना 
परत  घेऊन 
कुठे  घसरून  न पडता,
मी  घरी  पोचतो. 
माझ्यातल्या  प्रत्येकाचा  अनुभव  वेगवेगळा. 
माझा  माझ्यावरच  ताबा  जातो..
ह्या  अनुभवांना  मी  पारखा होऊ इच्छित नाही. 
म्हणून  केलेला  एक 
केविलवाणा  प्रयत्न. 
अगदी 
निसरडा ...