घोड्यासमोरच प्याद पुढे घेऊन मी डाव open केला. समोर सुन्या होता त्यामुळे आधीच tension आलं होतं. त्याने वाजीरासमोरच प्याद हलवलं आणि 'G4E5' असं काहीतरी बोलला. "थांब रे! माझा वजीर येऊ दे तुझ्या हद्दीत. मग बघ कसा बाजीप्रभू लढतोय माझा." सुन्याचा बुद्धीबाळातला अनुभव आणि माझा निरुत्साह, त्याचं technical knowledge आणि माझी भीती, त्याच aggression आणि माझ अज्ञान. एकंदरीत मी हरणार हे निश्चित होतं, तरीसुद्धा मी खेळ सुरु केला.
सुनील उर्फ सुन्या माझा दोस्त, "chess आपली जान आहे" . आणि मी. anti chess जास्त खेळलेलो. तरीपण सुन्या दर गुरवारी येतो आम्ही त्याच्या भाषेत च्येस खेळतो आणि मी हरतो.
साधारणपणे मध्यावर डाव आला असेल. माझ जास्त काही लक्ष नव्हते. माझी ३ प्यादी दोन्ही उंट आणि १ हत्ती मेला होता. सुन्याचे दोन्ही घोडे १ उंट आणि १ हत्ती गेले होते. अजून थोडा वेळ त्याच्या वजीराचा हैदोस चालू होता. मला तर काहीच कळत नव्हत. थोड्या वेळानी सुन्याच म्हणाला "साला तुझे दोन्ही घोडे जीते ठेवले आणि माती खाल्ली."
आज सुन्या हरला होता. त्यापेक्षा मी सुन्याला हरवल होत. हा हः हा करत मोठ्याने हसत मी उठलो. खरतर मी जिंकलोय हे मलाच कळलं नव्हतं, पण माझे दोन्ही घोडे उपयोगात आले होते आणि त्याच्या राजाला मी शह दिला होता.
सुन्यानी माझ्याशी अबोला धरला. चहा घेणार का? असं विचारलं तरी उत्तर नाही मिळालं. संध्याकाळ होत आली होती, मी चहा टाकला. दोन cup भरले. त्याचा table वर वाजवून ठेवला, camera घेतला आणि गच्चीत जायला निघालो. खरच किती दिवसांनी गच्चीत आलो होतो. आःहा. कट्ट्या वर cup ठेवला, बाहेरच्या बाजूला पाय सोडले आणि camera हातात घेऊन बसलो. मस्त. एक. सूर्य मावळायला आला होता पण ढगाआड लपला होता. मान फिरवून बघितलं..चंद्र पण आला नव्हता. cup ओठाला लावला, दोन घोट प्यायलो cup खाली ठेवला. camera उघडला. पश्चिमे कडून वटवाघालांचा प्रवास सुरु झाला होता. समोरची building ९व्या मजल्या पर्यंत आली होती. साधारणपणे ३/४ मिनिटात सूर्यास्त होणार होता. पाहिला फोटो काढला, दुसरा फोटो काढला आणि तिसरा फोटो शोधू लागलो.
तेवढ्यात सूर्य ढगातून बाहेर आला. cup ठेवायला मागे वळलो तर चंद्र पण उगवला. बाप. सूर्यास्त आणि चंद्रोदय. ११११११११११११११. पण फोटो कोणाचा काढू? चंद्र का सूर्य? पुढा का मागे? माझा घोडा झाला होता. एक झालं दोन झालं आणि मग अडीच पुढे का मागे अश्या प्रश्नात मी अडकलो. पण फोटोच्या बाबतीत मी risk घेऊ शकत नाही. कचकच सगळे फोटो काढले. सूर्य दिसेनासा झाला होता. चंद्राकडे पाठ होती.
अश्या वेळेस मी विचारात पडतो. सहज हसू आले. "साला तुझे दोन्ही घोडे जीते ठेवले आणि माती खाल्ली." माझा घोडा होणं. हसू वाढू लागले. एक भुवई वर गेली. मग उंटासारखी तिरकी चालणारी माणस दिसू लागली. मग हत्तीसारखी सरळ जाणारी. वजीरासारही स्वच्छंदी. पण घोडा. एक दोन अडीच? घोड्यासारख्याची चाल का अडवली? ती पण दोन नाही किंवा तीन. अडीच वर? बाप रे. त्रास व्हायला लागला. पण साला त्यालाच निर्णय क्षमता पण आहे. अड़ीचाव घर डावीकडे का उजवीकडे हे ठरवायची. ८ घरांचा option आहे त्याला. आपल्याच भिडूच्या डोक्यावरून उडी मारून जातो साला. सर्व अडथळे पार करून गानिमे काव्यांनी हल्ले करणारा घोडा. मला विचार करायला लावत होता.
कोण चालत घोड्यासारख? मगाशी माझा का घोडा झाला होता? मी घोड्याचा वापर करूनच जिंकलो होतो. त्रास. मी चालतो का घोड्या सारखा? एक दोन अडीच. शाळेतून trek सुरु झाले, नंतर group छोटा झाला, आणि आता तर एकटा सिंहगडावर जातो. हीच अडीचावी चाल का? हेच ते अड़ीचावे घर का? camera घेतला, photo सुरु झाले आणि reflections ला फोटो लागला, हेच अड़ीचावे घर का? का मगाशी सूर्य का चंद्र हा पडलेला प्रश्न? बाप रे.
हे अडीचावे घर मला खुणावतंय . दोन चाली खेळल्यावर अडीच साठीचा मिळणारा option मला हवाहवासा वाटतोय. आपल्याच भिडूच्या डोक्यावरून जाणार घोडा मला कर्तव्यामुळे येणारे अडथळे पार करायला शिकवतोय. सरळ हल्ला करताना उंट वजीर डोळ्यात भरतात. पण down to earth राहूनच मला check द्यायचाय. पडद्याआड राहून सवंगडयाना साथ द्यायची आहे. "कधीही हाक मारा, हे पोरग कुठूनही येणारच" हा विश्वास निर्माण करायचाय. माहित नाही हे बरोबर आहे का? मला जमेल का? सगळ्यांना पटेल का? पण ते अडीचावे घर खुणावतंय. ध्रुवाच अढळ पद नाही मिळाले तरी चालेल पण अडीच. पाहिजे.
साफ अंधार झाला होता. चंद्र डोक्यावर येऊ लागला होता. इतक्यात सुन्या आला. "चले चल. लई मोठा आला मला हरवणारा. पिल्लू आलीये खाली तुझी. आवरा आता."
मी हसत हसत उठलो. सुन्यापण नॉर्मलला आला होता. मला पण बरीच उत्तर मिळाली होती. जिन्यातून उतरताना मी एक दोन आणि धाप कान अडीच असं करत उतरू लागलो.
No comments:
Post a Comment