खाली आलो तर पिल्लू घरात येऊन बसली होती. दारात चपला दिसल्या आणि आतून TV चा आवाज येत होता. आमचा पाऊलआवाज आल्यावर TV बंद झाला आणि पिल्लू बाहेरच्या खोलीत आली. मी माझा cup आत ठेवला आणि कैमरा हातातच अश्या नेहमीच्या style मध्ये बाहेर आलो. general गप्पा सुरु झाल्या . पिल्लू college मधल्या काही गोष्टी सांगत होती. सुन्या galleryt उभा राहून “मैत्रीण” (त्याची मैत्रीण मुंबईला असते, माझं आणि तीच फारसं पटत नाही) शी बोलत होता. आमचं बोलणं ऐकू यईल एव्हढ्या अंतरावर.
“आज ambrosia ला जावू” .मी
सुन्या “मी नाही ” अश्या खुणा करू लागला. “ठीक आहे ” पिल्लू . मी landline वरून सरळ सुन्याच्या घरी phone लावला आणि तो जेवायला येणार नसल्याचं कळवलं. ‘मैत्रीण’शी बोलत असल्यामुळे त्याला काहीच करता आले नाही.
“आज पोर्णिमा आहे. मस्त poolside बसू ” मी.
“वेळेत निघू आणि वेळेत येऊ ..एए सुन्या अवर रे. दे इकडे मी बोलते ” पिल्लूनि त्याच्याकडून phone हिसकावून घेतला. मग त्या दोघी सुरु झाल्या. पिल्लू आणि मैत्रीण छान जोडी जमते. full gossip आणि खरेदी एकत्र. मी आणि सुन्या दोघही सुखी . दोघी phone वर बोलत असताना आम्ही बर्यापैकी आवरून बाहेर आलो. car काढली. तरी phone चालूच होता. चांदणी चौकात पोहोचल्यावर phone परत सुन्याकडे गेला ते अगदी जेवण येईस्तोवर.
पोर्णिमा …. Ambrosia, poolsaide…., हलका उजेड आणि समोर photogenic face…. Photo काढायचं टाळणं अश्यावेळी खूप अवघड असते. पण काय करणार पिल्लूला आवडत नाही असं फोटो काढण. Obvisuosly आधीचे तिचे असे photo मात्र तिला खूप आवडले आहेत. Frames मनात साठवून ठेवत होतो. जेवण झालं bill दिले आणि बाहेर आलो. भूगाव पर्यंत खाली आलो. परत येताना रसत्यावर कोणी नाही बघून head lamp बंद केले. आआआआआछ्ह 11111. पहिले किंचाळलेली पिल्लूनंतर आपोआप शांत झाली. स्वच्छ चंद्र प्रकाश. शांत रस्ता. पोहनकरांचे ‘का करू सजनी’. आणि मागच्या seat वर सुन्या. Just missed. (बहुतेक हे पण ते अडीचावे घर असेल ) पिरंगुटचा घाट आला तसे light परत लावले. परत चांदणी चौकात आलो तोपर्यंत 10 वाजले असावेत .
Naturals ला ice-cream खायला आल .. Ice cream घेऊन बाहेर येऊन बसलो. General गप्पा चालल्या होत्या. मी मगासच्या drive मूड मधून बाहेर आलो नव्हतो. May be यायचा हि नसेल, त्यामुळे मी शांत होतो. उर्वरित दोघे काहीतरी उर्वरित बडबड करत होते. सुन्या आजची हार साफ विसरला होता पण मला आज हार खुणावत होती. (मला आज हरायचे होते) का कोण जाणे moonlight drive वर मी हरलो नव्हतो. का कोण जाणे एक फोटो अजून बाकी होता. अडीचावे घर बाकी होते. काहीतरी अडकल होतं.
तेवढ्यात एक छोटी मुलगी समोर आली. ना ती फुगे विकत होती ना ती काही मागत होती (भीक हे शब्द मी मुद्दाम टाळले कारण तिनी तसे करू नये हि इच्छा ). मी शक्यतो अश्यांपासून दूर राहतो. त्यांना काही देणं मला पटतही नाही पण मग काय करायच? ह्या प्रश्नाचे उत्तरहि माझ्याकडे नसते. पिल्लुनी तिला ice-creame हवं का विचारले. तर नको म्हणाली. मानेनीच. Her stare was killing me. मी साफ हरलो होतो. मी तिची नजर टाळू इच्छित असलो तरी मला शक्य होत नव्हते. डाव्या डोळ्याखालच्या पाण्याचा रेघेत मला बघायचे नव्हते. अश्यावेळी मनात उभे राहणारे सर्व प्रश्न टाळायचे होते. कोण हि? कुठे राहते? असं कश्यामुळे करत असेल? आई वडील? Slumdog ची चित्र समोर येऊन गेली. पण हे सर्व प्रश्न मी टाळू शकलो.
तिच्या डोळ्यातच तेव्हढी ताकद होती. साफ हरलो होतो मी. माहित नाही काय झालं होत मला. काय भावना होत्या माझ्या मनात. जाणून घायची इच्छहि नव्हती. काहीच जाणून न घेण्याची इच्छा. खरतर असं फार कमी वेळा होत. पण आज तस झालं होत आणि मला ते जगायचं होत. कोणताही भिकारी समोर आला कि स्वतापासून पळून जाणारा मी, ह्या सर्व प्रश्नानपासून अलिप्त राहायचा प्रयत्न करणारा मी आज वेगळाच वागत होतो. का कसं कधी कोणासाठी असल सर्व प्रश्न टाळून मी पाण्याची बाटली तिला दिली. तिनी पण ती शांतपणे घेतली. मलाच कळलं नाही मी camera केंव्हा उघडला आणि photo काढला. पण ती continue माझ्याकडे पाहत होती. अगदी थेट lens मधून माझ्या डोळ्यातून आत, माझ्यात. पाणी पितानासुद्धा. बाटली परत देऊन, मागे वळून न बघता ती शांतपणे रस्ता cross करून निघून गेली.
100 अनुत्तरीत प्रश्न .
पिल्लू डोळे मोट्ठे करून, अवाक होऊन माझ्याकडे पाहत होती. ह्याला आज काय झाले? सुन्या photo पाहून वेडा झाला होता. आणि naturals चा security वाला.....
आजही तो photo बघताना अंगावर शहारा येतो. मी त्याचवेळी असं अनपेक्षित का वागलो .आणि अनपेक्षित मलाच.बाप रे. बरोबर तिला पाणीच हवं आहे हे मला कसं कळलं . .का माझीच अर्धवट राहिलेली तहान तिनी भागवली होती. स्वच्छ चंद्र प्रकशात न्हाहून न भागलेली तहान. photojenic face समोर असताना photo राहिल्याची तहान... कसली धीट होती ती. असे photo कधीच जमणार नाहीत असं वाटणारा मी नकळत असा फोटो काढून गेलो कि जो मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. Zoom in करून पाहिला कि डोळे …त्यात राग नव्हता, innocence नव्हता, काही मागण नव्हतं, काही सांगण नव्हतं. फक्त माझ्याकडे बघणं होते (आणि एक catchlight ). आजही photoतून तेच भाव समोर येतात. मी तो photo अजून कोणाशीच hare नाही केला. May be हि पण एक विसरण असेल.माझ्यात हिम्मत नाही कि माझ्या ती लक्षात आहे हे मी सर्वांना ओरडून सांगेन. मी उत्तर शोधायच्या भानगडीत पडलोच नाही. मला ती मिळणारच नव्हती .
Ha kharach tu kadhlays? Sundar. Jasa lihilays tasach vattay. sahi writeup
ReplyDelete