मला चंद्र आवडतो.
स्वयंप्रकाशित नसला,
तरीही प्रकाशमान .
असं वाटत कि माझे सगळं म्हणण
तोच ऐकून घेतो.
एकही शब्द उलटा reflect न करता
सच्च्या दिलानं.
मला अमावस्येचा चंद्र आवडतो
स्वतःचं अस्तित्व न दाखवणारा
ध्रुवा पेक्षाही अढळ.
अमावास्येच्या रात्री मी मुद्दामहून गच्चीवर जातो
त्याला शोधायचा खूप प्रयत्न करतो
त्याला खूप काही सांगायच असतं
मी सांगून मोकळा होतो
तो मात्र दिसतच नाही
मग मला प्रतिपदेची कोर आवडली ..
“मी आहे ”.असं सांगणारी
पण छोटासी ती ..माझं सगळ ऐकून घेईल का?
मग द्वितीया…तृतिया ..
अष्टमी ..perfect half
पण मन भरत नाही.
मग वाटलं पौर्णिमेचा चंद्र खरा .
कसा एकदम प्रकाशमान
पण एव्हढ्या प्रकाशाचा त्रास होतो
मी सच्च्या दिलानं त्याला सांगू शकत नाही.
मला अमावास्येचाच चंद्र आठवतो
स्वतःचं अस्तित्व न दाखवणारा
तरीही तिथेच असणारा
माझं सगळं ऐकून घेणारा….
सच्च्या दिलान …
मला कळलेला अर्थ आणि त्यावर कवीला माझी प्रतिक्रिया:
ReplyDeleteकवीला चंद्राचा असलेलं भौतिक आकर्षण आणि भावनिक भूकेमधून तयार झालेली पोकळी याच्या संयुक्त प्रभावातून कवीने चंद्राबरोबर एक भावनिक नातं जोडायचा प्रयत्न केला आहे. कवीला ह्या नात्याच्या अस्तित्वाची संकल्पनाच खूप आधार देते असा वाटतं. वास्तविक पाहता त्याला जेव्हा मन मोकळं करावसं वाटतं, तेव्हा त्याला चंद्राचा भौतिक अस्तित्व पण नकोसच वाटतं म्हणूनच त्याला अमावस्येचा चंद्र अधिक जवळचा वाटतो. अंधार असला, तरी मागे कोणीतरी आहे माझा ऐकायला, हि जाणीव कवीला शांत करते.
कवीला माझं असं सांगणं आहे कि अरे कविराया, चंद्राच्या रोजच्या तर्हा तुला वरवर आवडतही असतील, पण अमावास्येच्या नसलेल्या चंद्राशी बोलण्यापेक्षा त्या असंख्य चांदण्या बघ. कदाचित त्यातलीच एखादी चांदणी तुझ्याशी बोलायला, भेटायला आसुसली असेल... अमावस्येची वाट बघत....
Thnx LEO, perfect expression of ur thoughts. lets see. Atleast 'A' can try for this.
ReplyDelete