Friday, June 22, 2012

Jatana


तो,
आणि
पाऊस हि
तसे एकाच वेळी परत निघालेत.
आता मात्र त्यांच्या ठरलेल्या वेळेसच.

त्याला ओंजळीत घ्यायचंय,
डोळे मिटून शांतपणे त्याच्या मिठीत जायचंय,
अंगावरून ओघळणारा प्रत्येक थेंब 
तो चाललाय 
ह्याची जाणीव करून देत असतो.

मध्येच एखादी वीज चमकावी
तशी मी दचकून जागी होते. 
खरंच,
आता निघायची वेळ झालीये.

माहिती असते तो येणारे परत,
सगळेच त्याची वाट बघणार असतात,
पण माझ्याइतकी?
बहुदा पाऊसच माझ्याइतकी त्याची वाट बघू शकेल.

आता पश्चिमेला 
ढगाआड 
संध्याकाळचे 
गुलाबी रंग दिसू लागलेत..
सुटणाऱ्या गाडीतून 
गुलाबी रुमाल दाखवावा 
तसे 

एक नशीबवान 
विमान 
त्याच दिशेला 
उडत जाताना दिसतंय 
मी मात्र 
Gallery तून शांतपणे बघत राहते .



अजूनहि कपडे ओले आहेत.
दुपट्ट्याला अजूनही त्याचा वास येतोय.
एकट्या घरात 
त्रास देतात अश्या गोष्टी.

माहिती आहे 
अवकाळी एखादी सर बरसणार असते,
आठवणींच्या तळ्यात एखादा तरंग उठणार असतो,
त्याची आठवण डोळ्यातून अचानक वाहणार असते.


तो आणि पाऊस
तसे एकाच वेळी परत निघालेत.

1 comment:

  1. krupaya asha itaranchya jivala tras denarya kavita lihitana 'vaidhanik ishara' det ja.
    mast ahe.

    ReplyDelete