हल्ली मी तिच्याविषयी काहीच बोलत नाही,
ह्याचा अर्थ मला तिची आठवण येत नाही
Phone उघडून wallpaper पाहतो
सरळ phonebook मध्ये
तिच्या नावापाशी जाऊन थांबतो.
Call आणि back अश्यादोन बटनांवर
अंगठा खेळत राहतो.
शेवटी back बटन जिंकतं आणि
मी call न करता phone बंद करतो.
ह्याचा अर्थ मला तिच्याशी बोलायचं नसतं
असा नाही,
ह्याचा अर्थ मला तिची आठवण येत नाही
तिचा वाढदिवस जवळ आला कि
मी gift shops पालथी घालतो
कधीतरी एखादं gift घेऊनहि येतो.
माझ्याकडे तिचा address असतो
DTDC 24 तासात पोचवायला तयार असतं.
तरी ते gift मी पाठवत नाही
ह्याचा अर्थ मला तिचा वाढदिवस लक्षात नाही
असा नाही,
ह्याचा अर्थ मला तिची आठवण येत नाही
चुकून कधीतरी तिचाच phone आला तर
मनातून मी कचरतो.
तिचा phone rcv करतो.
काही गोष्टी बोलतो
काही गोष्टी टाळतो.
ह्याचा अर्थ मला तिला टाळायचं असतं
असा नाही,
ह्याचा अर्थ मला तिची आठवण येत नाही
सरतेशेवटी अशक्य अश्या डोंगरकड्यावर
उभा राहून मी तिला phone करतो.
तेंव्हा मी माझाच असतो.
ती जागा…तिची आठवण..सगळ्या गोष्टी त्रास देतात.
शेवटी मी जाणून बुजून बोलून जातो
“आपण आता कधीच भेटणार नाही ”
दोन्हीकडून शांतता .
ह्याचा अर्थ….
ह्याचा अर्थ.
Super ved! Khup intense ahe hi, too good.. awadli
ReplyDeleteMast!!!! :) but Sad end again..arthat ha akshep nahi.
ReplyDeletesahiye
ReplyDeletechhan ahe.... but I was going to say exactly what सखीमृणाल said :)
ReplyDeletethnx...next time try karin sad end nasel hyacha..pan nakki nahi..
ReplyDelete