भिंतीवरच्या frames, calenders, घड्याळे
सगळं काढलं, pack केलं...
पण भिंतीवर उरलेले पांढरे चौकोन कसे नेणार?
भिंतीवर लिहिलेलं "Life Is Crazzy" मात्र तिथेच आहे
अजून.
सगळे पंखे Lights
काढून घेतलेत..
MSEB meter पण surrender केलाय
माझ्या बरोबर "Repeat" पेग घेणारा अंधार मात्र तिथेच आहे
अजून.
साहेबांच "मेरा कुछ सामान"
save आहे hard-disk वर
पण त्यातल्या भावना कश्या नेणार?ते खरतर 'बहुत' तरीपण " कुछ सामान" तिथेच आहे
अजून.
सगळं सामान truck मध्ये load केलं
दाराला कुलूप लावलं...
पण अंगणातला जुई चा वेल कसा नेणार?
त्याचा सुगंध तिथेच दरवळतोय
अजूनही...
kya baat hai...
ReplyDeletearre ek number!
ReplyDeleteasach lihi, karan vachavasa vattay
ajun
Waah...! lajawaaab!
ReplyDeleteMastach... chhan lihilyas...
ReplyDeleteSurekh!!!
ReplyDelete