Naina lageeyan baarishan
Te sukke sukke sapne vi pijj gaye
Naina lageeyan baarishan
Rove palkan de kone vich neendh meri
Naina laggeyan baarishan
Hanju digde ne chot lage dil te
Naina laggeyan baarishan
Rut birha de badlan di chaa gayi
Song from the film "Anjana Anjani" and sung by "Shurti Pathak"
साला किती वेळा loop मध्ये टाकून ऐकल्या असतील ह्या चार ओळी, कडक.
Car चालवत होतो, आणि परत एकदा ह्याच ओळी ऐकू आल्या आणि मन सैरभैर झालं. भ***,
म्हणे नैना लगीया बारिशा, आमच्याकडे तर कित्येक वर्षांचा दुष्काळ होता. rather आहे.
शेवटचं कधी रडलो होतो आठवेच ना. आईचांद, न रडण्याचा इतका त्रास कधीच झाला नव्हता.
रडलो होतो, रंग दे बसंती मध्ये, लक्षण पांडे अस्लमला म्हणतो “मैने तुम्हारे साथ, मै तुम्हे हमेशा, ..sorry.” किती हि वेळा बघा हा shot, डोळ्यातून पाणी येणारच. No doubt. पण साला तेंव्हा मी एकटा असतो, मी माझाच असतो. हळवं मन शांत बसू देत नाही, आणि त्याचे म्हणणे डोळ्यावाटे बाहेर पडू लागते.
But these all are imaginary things. Not the real world. खरं कधी रडलो होतो? हम्म , 8th मध्ये कमी मार्क मिळाले म्हणून, but bull shit, त्यानंतर नाहीच, damn bull shit.13 years.
का ह्याला रडायची हौस, चांगलं आहे न. all is going well म्हणून. फार कमी लोकांचं असते असं. पण मी नक्कीच त्यांच्यातला नाही, मला हि, मी हि रडावे अश्या गोष्टी घडल्या, पण नाही रडलो. जमलंच नाही, भावना बोथट झाल्या म्हणालो तर, लक्ष्य बघताना रोशन नि त्याच्या dad ला phone केला कि हमखास पाणी येतंच येतं.
मग काय? सगळ्यांच्या देखत रडण्याचा complex?
May be, or may be not.
Damn.
Shit.
काय त्रास आहे ..
&^%$
आजी गेल्यावर आजीचा लाडका नातू शांत होता, कोरडा होता.
Rove palakande kone wich neend meri.
Break up झाल्यावर, कोरडे डोळे photo शोधात हिंडत होते, एकटेच.
Hanju digde ne chot lage dil te.
जाम frustrate झालोय यार ..गच्चीत गेलो, मोठ्याने रडता येईल म्हणून,
नाही.
नाही.
Shower खाली उभा राहिलो,
नाही.
नाही.
Max.
माहित नाही किती वेळ गेला , bell वाजली, सुन्या होता.
आणि एकदम मी त्याच्या खांद्यावर डोके ठेवून रडलो. माझा control च नव्हता माझ्यावर. कसं काय एकदम झालं, नाही कळलं मलाही.
हीच कमी होती का? एका खांद्याची?, ज्यावर डोके ठेवून शांतपणे रडता येईल? Yes.एक hug,. तो एक खांदा Now I feel jealous, जे मस्त मध्ये रडू शकतात, कारण कोणतही असो, मनसोक्त रडू शकतात.
त्यांच्याकडे एक खांदा असतो डोकं ठेवायला.
रडायला .
Rut birha de badlan di chaa gayi
Rut birha de badlan di chaa gayi
hmmmmm..........
ReplyDeleteawadala kirnya... cant explain why.. but patala mala....
ReplyDeletekhoop khar lihilay...!!!
ReplyDelete